Milk Adulteration : दूध भेसळ नियंत्रण समितीची धुळे शहर, साक्रीत कारवाई

Dudha Bhesal News : दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी पथकाने धुळे शहरासह साक्री तालुक्यात कारवाई केली.
Milk Adulteration
Milk AdulterationAgrowon
Published on
Updated on

Dhule News : दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी पथकाने धुळे शहरासह साक्री तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत पथकाने धुळ्यात एकूण १३१ लिटर, तर साक्री तालुक्यात ७३ असे एकूण २०४ लिटर भेसळ दूध नष्ट केले. दुग्धजन्य पदार्थांचे दोन नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले.

Milk Adulteration
Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करणार

शहरातील वाडीभोकर रोडवर एका ठिकाणी कारवाईदरम्यान त्रयस्थ व्यक्तींनी पथकातील कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती दूध भेसळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली. धुळे जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती संयुक्त पथकाने दुधात भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छतेवरून विक्रेत्यावर कारवाई केली.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, निरीक्षक वैधमापनशास्त्र आर. सी. पाटील, सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील पशुधन पर्यवेक्षक चिन्मय सोनवणे, विस्तार संकलन प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, शासकीय दूध योजना धुळेचे विजय भदाणे, त्या-त्या परिक्षेत्रातील पथकाने तपासणी केली.

धुळ्यात १३१ लिटर दूध नष्ट

धुळे शहरातील नकाणे रोड, वाडीभोकर रोड, तुळशीरामनगर आदी परिसरात दूध विक्री संकलन करून विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांच्याकडील दुधाची ३ ऑक्टोबरला तपासणी करण्यात आली. सहा दूध विक्रेत्यांकडील २५१ लिटर दुधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी केली असता, त्यांपैकी पाच दूध विक्रेत्यांच्या काही दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास चव, कचरा, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी १३१ लिटर (गायीचे ३६ लिटर, म्हशीचे ९५ लिटर) दूध नष्ट करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com