Supreme Court Agrowon
ॲग्रो विशेष

Industrial Alcohol Laws : औद्योगिक अल्कोहोलसंदर्भात कायद्यांचा अधिकार राज्यांनाच

Supreme Court Decision : औद्योगिक वापरासाठीच्या अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा केंद्र सरकाला नव्हे, तर राज्यांना हक्क आहे.

Team Agrowon

New Delhi News : औद्योगिक वापरासाठीच्या अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा केंद्र सरकाला नव्हे, तर राज्यांना हक्क आहे, असा बहुमताने निकाल देत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जणांच्या खंडपीठाने पूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरविला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सात जणांच्या खंडपीठाने १९९७ मध्ये निकाल देताना औद्योगिक वापरासाठीच्या अल्कोहोलच्या उत्पादनावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याचा निर्वाळा दिला होता.

त्याविरोधात दाद मागण्यात येऊन हे प्रकरण २०१० मध्ये नऊ जणांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले होते.

या प्रकरणी निकाल सुनावताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या अल्कोहोलच्या उत्पादन, निर्मिती आणि पुरवठ्यावर नियंत्रणाचा कोणताही अधिकारी केंद्र सरकारला नसून हे अधिकार राज्य सरकारांकडे आहेत, असे आठ विरुद्ध एक असा बहुमताने निकाल देत स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT