Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver : कर्जमाफीबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ ः मुख्यमंत्री फडणवीस

CM Devendra Fadanvis : राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरविणार नाही. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘‘राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरविणार नाही. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत. त्यामुळे कर्जमाफीबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी (ता. २१) आयोजित ‘वारकरी भक्तियोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. आळंदीजवळील मोशी येथील प्रस्तावित कत्तलखान्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘विकास आराखड्यात आळंदीजवळ मोशीमध्ये कत्तलखान्याचे आरक्षण दाखविले आहे.

कोणत्याही परिस्थितीत आळंदीजवळ कत्तलखाना करता येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वत: दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये किंवा त्याजवळ मोशीत अशाप्रकारे कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.’’

पालखी सोहळ्यादरम्यान आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी वारकरी, पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या दमदाटीच्या प्रकराबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘पालखी सोहळा हा अतिशय आनंददायी आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी आहेत. परंतु, भविष्यात असे प्रकारे घडू नयेत, यासाठी संबंधितांशी चर्चा करण्यात येईल.’’

जागतिक शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील विद्यापीठे पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये असावीत, असा प्रयत्न होत आहे. त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चालली आहे, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT