
Nashik District Bank loan issue : नाशिक जिल्हा बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना व्याजमाफी करण्याची मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल घ्यावी, यासाठी लवकरच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय रविवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची व थकबाकीदार शेतकऱ्यांची नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक येथे बैठक झाली. कर्जवसुली बंद करावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने फक्त मुद्दल घ्यावे, संपूर्ण व्याज शासनाने भरावे या विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, असेही ठरविण्यात आले.
संघटनेचे उपाध्यक्ष देविदास पवार, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, सोपान कडलक, दत्तू थोरात, सोपान संधान, बाळासाहेब शेवाळे, माणिकराव निकम, सुनील बिरारी, केशव सूर्यवंशी, दीपक नाठे, नयन सोनवणे, रामनाथ ढिकले, दत्तात्रेय कडलग, बाळू नाठे, लक्ष्मण मते, संदीप सोनवणे, प्रवीण जाधव, देविदास अहिरे, उमाकांत शिंदे, कचरू बागूल उपस्थित होते.
शासनाकडे पॅकेजची मागणी
याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आदिवासी विकास मंत्री प्रा. उईके यांची भेट घेण्याचे निश्चित झाले.
जिल्हा बँकेच्या कर्जवसुली विरोधात शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पॅकेजची मागणी केली आहे. बँकेची सक्तीची वसुली थांबलीच पाहिजे. बँकेने उताऱ्यावर नाव लावण्याची प्रक्रिया थांबवली पाहिजे, अशी जोरदार घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.