Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Workshop: कृषी विभागाची उद्यापासून राज्यस्तरीय कार्यशाळा

State Level Agriculture Workshop: राज्यातील बदलत्या हवामान आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग ९ एप्रिलपासून राज्यस्तरीय अधिकारी-कर्मचारी कार्यशाळा घेणार आहे. या कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञान, एआयचा वापर, कीडनाशक अवशेषमुक्त शेती यावर विशेष चर्चा होणार आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्याच्या कृषी क्षेत्रात भविष्यातील संधी व आव्हानांचा वेध घेण्यासाठी बुधवारी (ता. ९) होत असलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेची जय्यत तयारी कृषी विभागाने केली आहे.पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होत असलेल्या ‘कृषी अधिकारी-कर्मचारी कार्यशाळा २०२५’ मध्ये कोरडवाहू शेतीपासून ते कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर, अशी व्यापक चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेचे उद्‌घाटन मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यशाळेत कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल, कृषी विभागाचे प्रधान विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंग,

‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व वनौषधी मंडळाचे अभियान सुनील महिंद्रकर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाताना कृषी विभाग व शेतकरी कसे सक्षम राहतील, याचा वेध घेण्यासाठी राज्य ते गावस्तर अशा घटकांना एकाच व्यासपीठावर आणणारी कृषी विभागाची ही पहिलीच कार्यशाळा आहे. यात राज्यातील सर्व कृषी संचालक, सहसंचालक, सर्व अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, जिल्हा परिषदांचे कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक,

मंडळ कृषी अधिकारी सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यातून एक कृषी पर्यवेक्षक व एक कृषी सहायक निमंत्रित करण्यात आल्याने अंदाजे सव्वा दोन हजार अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. जागतिक हवामान बदलामुळे वाढते तापमान व हवामानातील अनिश्चिततेला राज्य सामोरे जात आहे. यातून नैसर्गिक आपत्तीची वाढती वारंवारता, अति व कमी पाऊस, दुष्काळ, कमी व अधिक तापमान तसेच कीड, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्या वाढत आहेत. त्यामुळेच या आव्हानांचा वेध घेताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणाऱ्या संधींचा वेध या कार्यशाळेत घेतला जाणार आहे.

कृती आराखडा तयार होणार

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, गटशेती, प्रक्रिया, कीडनाशक अवशेष मुक्त कृषी उत्पादन पद्धती, कृषी विस्तार अशा विविध अंगाने या कार्यशाळेत चर्चा होईल. त्याआधारे राज्याच्या कृषी वाटचालीचा एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : चिंता वाढणार: राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस; मराठवाडा, विदर्भात खंड पडणार ?

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT