Ashok Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Ashok Chavan Sugar Factory : खासदार होताच चव्हाण यांच्या कारखान्याला सरकारचे गिफ्ट

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काँग्रेसला धक्का देत काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवत खासदार केले. यानंतर आता राज्य सरकारने देखील त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांच्यासह अजित पवार गटातील काही नेत्यांच्या कारखान्यांवर सरकारने मेहरबानी दाखवली आहे. राज्य सरकारने अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला आर्थिक मदत म्हणून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे.

थकहमी पोटी १४७.७९ कोटींची रक्कम

खासदार अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेने थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. तसेच कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांच्या कारखान्यांसाठी देखील आर्थिक मदत राज्य सहकारी बँकेकडून करण्यात आली आहे.

अशीच आर्थिक मदत काँग्रेसमधील धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला बँकेकडून करण्यात आली असून ५९.४९ कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र पंकजा मुंडे, संग्राम थोपटे यांच्या कारखान्यांना कोणतीच मदत देण्यात आलेली नाही.

राज्य सहकारी बँकेकडून मदत

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कल्याणराव काळे यांच्या कारख्यान्याला १४६.३२ कोटी रुपये, प्रशांत काटे यांच्या सहकारी साखर कारखान्यास १२८ कोटी आणि अमरसिंह पंडित यांच्या बीडमधील कारखान्यास १२८ कोटींची मदत बँकेकडून करण्यात आली आहे.

एनसीडीसीने दिले कोणा कोणाला जीवदान

दरम्यान राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून राज्यातील पाच नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान देण्यात आले आहे. यात भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अभिमन्यू पवार आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT