Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Season : राज्य सरकार नमले; गाळप हंगामाला मान्यता

Sugarcane Season Update : राज्याचा ऊस गाळप हंगाम गुरुवार (ता. १५) पासून सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याचा ऊस गाळप हंगाम गुरुवार (ता. १५) पासून सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे साखर आयुक्तालयाने जवळपास १०० साखर कारखान्यांना गाळप परवानेदेखील जारी केले आहेत.

राज्याचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी मंत्री समितीने घेतला होता. परंतु काही राजकीय नेत्यांनी त्यात खोडा घालून हंगाम २० नोव्हेंबरनंतर सुरू करण्याचा आग्रह धरला होता.

त्यामुळे कोणत्याही कारखान्याला तूर्त गाळापाचा परवाना देऊ नये अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. या भूमिकेला साखर संघ व ‘विस्मा’ने कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्य सरकार नमले व गुरुवारी (ता. १४) अंदाजे १०० कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी गाळपाचे परवाने वाटताना एक अट टाकली आहे. ‘‘मंत्री समितीने निश्चित केल्यानुसार किंवा निवडणूक आयोगाने काही सूचना केल्यास त्यानुसार साखर कारखान्याला कामकाज करावे लागेल,’’ अशी अट परवाना देताना टाकण्यात आलेली आहे.

दरम्यान, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘यंदा गाळपाला उशीर झाल्यामुळे साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. परंतु, आणखी उशीर होणार नाही याची काळजी घेतल्यामुळे आम्ही साखर आयुक्तालय व राज्य सरकारचे अभिनंदन करतो,’’ असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT