Police Patil Remuneration Agrowon
ॲग्रो विशेष

Police Patil Remuneration : पोलीस पाटलांचे थकलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा; चार महिन्यांच्या मानधनापोटी २१.७३ कोटींचा निधी

Police Patil Remuneration News : राज्यातील पोलीस पाटलांचे मे महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत असे चार महिन्याचे मानधन थकले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.३१) नागपूर येथे पोलीस पाटिलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावू असे म्हटले होते.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील पोलीस पाटलांचे मे महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत असे चार महिन्याचे थकलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने शासन निर्णय काढत चार महिन्यांच्या मानधनापोटी २१ कोटींच्या निधी वितरणाला मान्यता दिली आहे. चार महिन्यांच्या मानधन मिळण्यासह पोलीस पाटलांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाने केली होती. त्याप्रमाणे आता थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लागला असून निवृत्तीच्या वयाचा प्रश्न जैसेथे आहे. यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील पोलीस पाटलांचे गेल्या ४ महिन्यांपासून मानधन रखडले होते. त्यावरून नागपूर येथील ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर या प्रश्न मांडण्यात आला होता. तसेच मानधन लवकर मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावू, असे म्हणताना सोमवारी (ता. २) शासन निर्णय निर्गमीत केला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती.

त्याप्रमाणे गृह विभागाने शासन निर्णय काढला असून थकीत मानधनापोटी २१.७३ कोटी आणि वितरीत करण्यात आलेले १३४.५१ कोटी अशा एकूण १५६. २४ कोटी इतक्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे.

नागपूर येथील ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात फडणवीस यांनी रखडलेल्या मानधनासह सेवानिवृत्तीच्या वयावर वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांनी पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या मुद्द्यावर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटलं होतं. तर सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करू, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT