Water scarcity in Khandesh Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : संभाव्य टंचाई लक्षात घेता आत्तापासूनच उपाय योजना सुरू करा

Latest Agriculture News : बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होते. या कामासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंवेसवकांची मदत घ्यावी.

Team Agrowon

Satara News : पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती यांसह टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करून आत्तापासूनच उपाययोजना सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

यावेळी उपवनसंरक्षक आदिती भारद्वाजत, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्याकरी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया पाटील,जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. टंचाई आराखड्यामध्ये सर्व गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे असे नियोजन करा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पशुधनाला मार्चपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे.

जुलै २०२४ पर्यंत चाऱ्याचे नियोजन करा. यासाठी कृषी विभागाने गावांमधील जमिनी शोधण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही चारा उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करून चारा लागवडीचे प्रमाण वाढवावे. प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून कमीत कमी १० वनराई बंधारे बांधावेत.

बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होते. या कामासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंवेसवकांची मदत घ्यावी.

वनराई बंधाऱ्याबाबत सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करावे. वनराई बंधारे उभारणीसाठी बांधकाम विभागाची मदत घ्यावी. जिल्ह्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामेही मिशनमोड पूर्ण करावीत. यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण कमी होईल. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत १८६ गावांमध्ये काम करण्यात येणार

आहे.

या कामांची प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेऊन ही कामे सुरू करावीत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत कोयना धरणातील पाणी जसजसे कमी होईल तसतसा गाळ काढण्याचे काम सुरू करावे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे नियोजनही करावे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत टंचाई संदर्भात जी कामे सुरू आहेत ती ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

२७ हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार विभागांनी लागवडीचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष बांबू लागवडीचे काम सुरू करावे. लागवडीसाठी वृक्ष गावापर्यंत पोहविण्यात येतील. ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बांबू लागवड होईल या दृष्टीने काम करावे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’

NAFED Procurement Center: ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट

Soybean Future Ban: शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्याच्या हालचाली

Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग

Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल

SCROLL FOR NEXT