Pune News : यंदाचा लांबलेला मॉन्सून आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे फळबागांना फटका बसला आहे. यामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर संत्र्याचा समावेश असून, सततच्या पावसाने संत्र्यांची फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे समोर येत आहे. .परिणामी बाजारातील आवक आणि हंगामदेखील लवकर उरकण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २६) सुमारे ७०० पेट्यांची आवक झाली. या वेळी ८ डझन ते २० डझनाच्या पेटीला सुमारे ३०० ते ११०० रुपये दर असल्याची माहिती नागपूर संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली..Orange Crop Insurance : विमा भरपाई दिरंगाईला कृषी विभाग, कंपन्यांचे धोरण कारणीभूत.ते म्हणाले, ‘‘मागील आठवड्यापासून नागपूर संत्र्यांच्या आवकेला प्रारंभ झाला. मात्र सततच्या पावसाने फळांची गळ होत असून, माशीचा देखील प्रादुर्भाव झाल्याने हंगाम अडचणीत आला आहे. यामुळे आवक कमी होत असून, तीन महिने चालणारा हंगाम दीड महिन्यातच संपण्याची भीती आहे. .Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट .तसेच माशीच्या प्रादुर्भावामुळे संत्र्यांचा दर्जा आणि टिकवण क्षमता कमी झाली असून, संत्र्याला दोन दिवसांतच पाणी सुटायला लागले आहे. यामुळे तातडीने माल विक्री करावा लागत आहे. तर पाणी सुटत असल्याने खरेदीदार पण कमी खरेदी करत आहेत. तसेच सततच्या पावसाने आणि फळांना ऊन न मिळाल्यामुळे फळांमध्ये रंग आणि गोडी उतरली नसल्याने आंबटपणा वाढला आहे.’’....असे आहेत दरडझन आणि दर (रुपये)९-१० --- ११००८ - ११ - १०००१२ --- ८००१४ -- ७००२०० नग --- ५०० रुपये३०० नग ३०० रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.