Nanded News : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल-२ च्या वापराची सक्ती राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केली आहे. परंतु या पोर्टलला विरोध दर्शवून विक्रेत्यांच्या भावनांकडे कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व कृषी विविष्ठा विक्री केंद्रे मंगळवारी (ता. २८) खरेदी व विक्री बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन, पुणेचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील आणि महासचिव विपीन कासलीवाल यांनी दिली..राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल २ ही व्यवस्था हंगाम २०१५ पासून अमलात आणली. या पोर्टलबाबत विक्रेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापही साथी पोर्टल २ चा वापर सक्तीने सुरू आहे. यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. .Sathi Portal : साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री व्यावहारिक नाही .याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे अध्यक्ष तराळ पाटील, महासचिव कासलीवाल, तसेच कृषी संचालक (गुणनियंत्रण, पुणे) श्री. कुंभार यांच्या उपस्थितीत पुणे येथे विक्रेत्यांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतरही साथी पोर्टल-२ च्या अंमलबजावणी संदर्भात कोणतीही सकारात्मक कार्यवाही झाली नाही. .त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी मंगळवारी (ता. २८) एक दिवस खरेदी व विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथी पोर्टल २ च्या वापरासंदर्भात राज्यातील सर्व विक्रेत्यांनी विरोध नोंदविण्यासाठी एकमुखी ठराव घेण्यात आला. यास सर्व जिल्हा संघटनांनी मान्यता दिली आहे. सर्व विक्रेत्यांनी विक्री केंद्रांवर साथी पोर्टल २ अंमलबजावणीविरुद्ध विक्रेत्यांचा निषेध, असे फलक लावून शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. .Seed Sale : ‘साथी’द्वारे बियाणे विक्री न करणाऱ्यांना नोटिसा.मंगळवारच्या राज्यव्यापी बंदबाबत राज्याच्या कृषी संचालकांना (गुणनियंत्रण) यांना माहिती देण्यात आली आहे. सर्व जिल्हा अध्यक्षांनी व तालुका पदाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यांतून विक्रेत्यांना योग्य मार्गदर्शन देऊन संघटनेच्या सूचनांनुसार कार्यवाही करावी, या आंदोलनात शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे..साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (ता. २८) एक दिवस खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. राज्य विक्रेता संघटनेच्या निर्णयानुसार हा बंद संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी पार पडावा यासाठी सर्व जिल्हा व तालुका संघटनांनी प्रयत्न करावेत.- विपीन कासलीवाल, महासचिव, महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन (माफदा), पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.