Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Agriculture Exhibition 2024 : कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ

Agriculture Exhibition : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी सकाळ ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला गुरुवारी (ता. ११) पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शेतीतील नवीन तंत्रज्ञान, नवे प्रयोग, शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगाच्या विविध दालनांनी सजलेल्या ‘सकाळ ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला गुरुवारी (ता. ११) पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक स्टॉलवर जात माहिती घेत नावीन्याचा ध्यास घेतला. इच्छाशक्‍तीच्या बळावर अनेक गावांनी दुष्काळावर मात केली आहे, अशी निवडक गावे, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांच्या यशकथा अॅग्रोवनमधून प्रसिद्ध झाल्या या यशकथांवर आधारित ‘लढा दुष्काळा’शी हे विशेष दालन यंदाच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी ऊर्जास्रोत ठरले आहे.

जालना रोडवरील श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. रविवारपर्यंत (ता.१४) हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी.के. एनर्जी सोलरपंप हे आहेत. इकोजेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन साकारले आहे.

पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या भागात लागलेल्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शेतकऱ्यांची पावले कृषी प्रदर्शनाकडे वळत होती. प्रदर्शनात शेतीची अवजारे, आधुनिक अवजारे, सूक्ष्मसिंचन यंत्रणा, खते, बियाणे, कीडनाशके, हरितगृह, प्रक्रिया, मळणीचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, फवारणीचे ब्लोअर, पॅकेजिंग, साठवणूक, शीतगृह यासंबंधीची दालनांवर माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.

त्याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी पेरणी, मशागत आणि लावणीच्या यंत्रांची माहिती घेत त्याची नोंदणीही करून घेतली. मशागतीची यंत्रे, ट्रॅक्टर, तणनाशके, कीटकनाशके, शेतीक्षेत्रातील नव्या प्रयोगांची पुस्तके आदी स्टॉलवर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. रोप लागवडीपासून सिंचनापर्यंत आणि जनावरांच्या सर्वांगीण आहाराबाबत घ्यावयाची काळजी या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. चारा पिकांच्या मुरघास तंत्राची माहितीही शेतकऱ्यांनी आवर्जून घेतली.

‘लकी ड्रॉ’द्वारे भाग्यवंत शेतकऱ्याला ट्रॅक्टर

कृषी प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळत होता. नाव नोंदणीनंतर अर्ज आणि सविस्तर माहिती प्रदर्शनाच्या मुख्य द्वारानजीक विशेष कक्षात भरून घेतली जात होती. भ्रमणध्वनीसह इतर माहितीसंबंधीचा अर्ज भरून घेतलेल्या शेतकऱ्यांमधील एका शेतकऱ्यास ‘लकी ड्रॉ’ काढून ट्रॅक्टर जिंकण्याची संधी मिळणार आहे. रविवारी (ता. १४) हा ड्रॉ काढण्यात येणार आहे.7775816644

नव्या तंत्रज्ञानाकडे तरुण शेतकऱ्यांचा कल

प्रदर्शनात सिंचन, रोप लागवडीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. विशेषतः सोलार पंप, ड्रोन तंत्रज्ञानाकडे तरुण शेतकऱ्यांचा कल अधिक दिसत होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT