Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या भगीरथांच्या चित्तरकथा

Hydroponics Technique : परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावचे तारासिंग राठोड यांनी २५० शेळ्यांचे बंदिस्त पालन सुरू केले. मुरघास, हायड्रोपोनिक्‍स तंत्राचा अवलंब करीत चाऱ्याची सोय केली. त्यापुढील टप्प्यात दुष्काळावर मात करण्यात ते कशाप्रकारे यशस्वी ठरले या दालनातून अनुभवता येणार आहे.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon

Success Story of Farmer : ‘अडली माती जिरलं पाणी, पीक पिकलं मोत्यावाणी!’ दुष्काळावर मात करताना कधीकाळी कडवंची गावच्या शेतकऱ्यांची दमछाक होत होती. आज मात्र हे गाव मृद् व जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कामांच्या जोरावर पाणीदार गाव झाले आहे.

दुष्काळावर मात करणाऱ्या अशाच शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भगीरथी प्रयत्नांची साक्ष देणारे ‘लढा दुष्काळा’शी हे दालन ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सध्या राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे या दालनाने लक्ष वेधले आहे.

राज्यातील दुष्काळप्रवण भागातील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत नव्या प्रयोगांच्या बळावर शेती फुलविली आहे. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावचे तारासिंग राठोड हे देखील त्यापैकीच एक.

त्यांची पावसाच्या पाण्यावरची जिरायती शेती. कुटुंबीयांना रोजगार हमीच्या कामावर जावे लागत होते. शेड उभारत त्यांनी २५० शेळ्यांचे बंदिस्त पालन सुरू केले. मुरघास, हायड्रोपोनिक्‍स तंत्राचा अवलंब करीत चाऱ्याची सोय केली. त्यापुढील टप्प्यात दुष्काळावर मात करण्यात ते कशाप्रकारे यशस्वी ठरले या दालनातून अनुभवता येणार आहे.

Agriculture Exhibition
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

पाण्याची कमतरता असलेल्या लातूर जिल्ह्यात तुकाराम, नामदेव व दिलीप येलाले या भावंडांनी सीताफळ लागवडीच्या माध्यमातून निर्माण केलेला आत्मविश्‍वास. गणेश काष्टे (राजेवाडी, ता. सेलू) यांनी दुष्काळात मुक्‍तसंचार गोठा पद्धतीने किफायतशीर केलेला दुग्ध व्यवसाय,

लाल कंधारी गोवंश संवर्धनात राज्यभर ओळख निर्माण करणारे माळसोन्ना (परभणी) येथील अनंत लाड, सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील वाघोलीकरांचा जलसंधारण पॅटर्न, छोट्या तलावावरील इंदोरी पॅटर्न अशी दुष्काळी लढवय्याची भरगच्च माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Agriculture Exhibition
Agriculture Success Story : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला फळ पिकांचे बळ

दुष्काळाशी लढताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील युवा शेतकरी हरी ठोंबरे यांनी हुशारीतून दोन शेततळी व ठिबक तंत्राद्वारे जल व्यवस्थापन केले. दुष्काळी परिस्थितीत साडेचार एकरांवर फळबाग फुलविली याची अनुभूती देखील या दालनाद्वारे घेता येईल.

म्हाळसापूर (सेलू, जि. परभणी) येथील गावकऱ्यांनी दुष्काळी स्थितीमुळे उद्‌भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासकीय मदतीवर विसंबून न राहता पडीक जमिनीवर गाव तलावाची निर्मिती केली. त्याकरिता लोकवर्गणीचा पर्याय अवलंबिण्यात आला. म्हाळसापूर ग्रामस्थांचा ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंगचा हा प्रयोग टंचाईग्रस्त गावांसाठी कसा प्रेरणादायी ठरला आहे.

कायम दुष्काळी ही अशी ओळख असलेल्या खानापूर (जि. सांगली) तालुक्‍यातील अडसरवाडी येथील निचळ कुटुंबाने देशी गोपालनातून साधलेली आर्थिक समृद्धी, मांडाखळी (जि. परभणी) येथील कणे यांच्या संयुक्‍त कुटुंबाने जोखीम व मजूरटंचाईवर मात करत यशस्वी केलेली शेती, बीडच्या जवळबन येथील करपे कुटुंबीयांचा एकात्मिक शेती पॅटर्न, नाशिकच्या पवारवाडीचे अरुण पवार यांचे डीफ्यूजर तंत्रज्ञान, जलसंधारणाचे कोनांबे रोल मॉडेल,

नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा ग्रामस्थांनी कशाप्रकारे दुष्काळ हद्दपार केला. खेड येथील केव्हीके बहुवार्षिक चारा लागवडीचे प्रयोग व तंत्रज्ञान, परभणी जिल्ह्यातील भोगादेवी गावाने दुष्काळावर केलेली मात अशा दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या लढवय्याची चितरकथा या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. ॲग्रोवन कृषी प्रदर्शनातील हे दालन आकर्षणाचे केंद्र ठरत असून, प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com