Satej Krushi Pradarshan : सतेज कृषी प्रदर्शनास सुरूवात, नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली

Agriculture Department : डी. वाय. पाटील ग्रुप, कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरविले आहे.
Satej Krushi Pradarshan
Satej Krushi Pradarshanagrowon
Published on
Updated on

Satej Agriculture Exhibition Kolhapur : सतेज कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळेल, देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा प्रदर्शनात सहभाग राहणार असून शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. तपोवन मैदानात सतेज कृषी प्रदर्शनाच्या उ‌द्घाटनप्रसंगी आमदार पाटील बोलत होते.

प्रदर्शनाचे उ‌द्घाटन प्रगतिशील शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्याहस्ते फीत कापून झाले. या वेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त तेजस पाटील, दूधगंगा साखर कारखान्याचे चेअरमन के, पो. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुणकुमार डोगळे होते.

डी. वाय. पाटील ग्रुप, कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरविले आहे. आमदार पाटील म्हणाले, 'सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून चार वर्षांत शेतोपूरक नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने शेती करण्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. हे पाचवे वर्ष आहे.

विविध शासकीय योजना, कमी खर्चातील दुग्ध व्यवसाय, पारंपरिक शेतीबरोबर मत्स्यशेती, फळबाग लागवड, फुलशेती स्थाचबरोबर शाश्वत शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन कृषी प्रदर्शनातून केले जाईल.' शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर म्हणाले, विकसित तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनातून मिळेल. कमी खर्चात दर्जेदार पोक घेण्यासाठी शेतीतज्ज्ञांमार्फत माहिती मिळेल, विविध कंपन्यांच्या मशिनरी व कर्जसुविधा यांचीही माहिती मिळेल.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, आर. के. पवार, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासो चौगुले, बयाजी शेळके, अजित नरके, राजू लाटकर, शारगंधर देशमुख, सचिन चव्हाण, सुनील मोदी, बिद्री संचालक राजेंद्र मोरे, संभाजी पाटील, आर. एस. कांबळे, विनोद पाटील, धीरज पाटील, सत्यजित भोसले, स्वप्नील व मान्यवर उपस्थित होते.

Satej Krushi Pradarshan
Satej Patil Sugar Factory : सतेज पाटील यांच्या साखर कारखान्याकडून एफआरपीपेक्षा २०० जादा देण्याचा निर्णय

आरक्षणाबाबत सरकारकडून फसवणूक

आरक्षणाबाबत सरकारचे धोरण काय असे विचारले असता भाजप सरकार आरक्षणाबाबत मराठा समाजाची फसवणूक करत आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत बेताल वक्तव्य करत आहेत. भुजबळ यांचे बोलवते धनी कोण हे महाराष्ट्राला कळाले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचे सरकारचे षडयंत्र आहे.

सरकारमधील एका मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य ते थांबवू शकत नाहीत. याचा अर्थ हे वक्तव्य सरकारचे समजायचे काय, असा सवाल आमदार पाटील यांनी केला. फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र अधिवेशनात काय निर्णय होणार हे सांगत नाहीत. एक मार्चनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आरक्षणाचा निर्णय रखडणार आहे.

आजचे व्याख्यान

मंगेश किसन भास्कर, डॉ. नरेंद्रकुमार जे सूर्यवंशी, डॉ. परिक्षित देशमुख यांचे नैसर्गिक शेती, भाजीपाला प्रक्रिया व दुग्ध व्यवसाय या विषयावर व्याख्यान होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com