Soybean rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : ‘नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा’

NAFED : बाजारात सोयाबीनचा दर हमीभावाच्या आत मिळत आहे. शेतकऱ्यांचे क्विंटल हजार रुपयांपर्यंत नुकसान होत आहे.

Team Agrowon

Akola News : बाजारात सोयाबीनचा दर हमीभावाच्या आत मिळत आहे. शेतकऱ्यांचे क्विंटल हजार रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. त्यातच केंद्राने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.

सोयाबीनला योग्य दर मिळण्याच्या उद्देशाने नाफेडने तातडीने खरेदी केंद्र सुरु करावेत, अन्यथा चार सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला. याबाबत मूर्तीजापूरमध्ये विविध शेतकरी निगडित संघटनांनी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठवले.

यात म्हटले, की सोयाबीन आयात करण्यामुळे खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा एक हजारांने कमी आहेत. परिणामी एकरी पाच ते १० हजारांरुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अशा स्थितीत सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी सप्टेंबर उजाडण्यापूर्वी जिल्ह्यात नाफेडने खरेदी केंद्र उघडावेत, शेतीनिविष्ठा, अवजारे, यंत्रसामुग्री यावरील २८ टक्क्यापर्यंतचा जीएसटी रद्द करावा, कोट्यधीश असणाऱ्या आमदार, खासदारांची पेन्शन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी, शेतमजुरांना दहा हजार रुपयाची पेन्शन सुरू करावी, पीक कर्ज वाटप कॅश क्रेडिट नियमानुसार करावे ,पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना द्यावी, हमीभाव व खुल्या बाजारातील शेतमाल विक्रीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घ्यावा, शेत कुंपणावर पंधरा वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज देऊन त्यावर अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

या मान्य न केल्यास ५ सप्टेंबरपासून मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर प्रत्येक गावातील शेतकरी साखळी उपोषण सुरु करतील, अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले. राजू वानखडे, प्रा. सुधाकर गौरखेडे, प्रमोद राजंदेकर, सेवकराम लहाने, कैलास साबळे, पंकज वानखेडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT