Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

kharif Crop : खरीप शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करा

Latest Agriculture News : चालू खरीप हंगामातील शेतीमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी आठवडा बाजारच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : चालू खरीप हंगामातील शेतीमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी आठवडा बाजारच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना निवेदन देऊन तालुका चिटणीस वसंत कांबळे, भरत सुतार, लक्ष्मण नाईक, जयवंत दळवी, व्हळ्याप्पा कांबळे, राजेश कांबळे यांच्या शिष्टमंडळाने या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले.

दोन निवडणुकांमध्ये स्वामिनाथन अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याचे वचन सरकारने दिले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बाजारातील साखरेचे दर गृहीत धरून ‘एफआरपी’पेक्षा किमान पाचशे रुपये अधिक दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे,

‘एफआरपी’चे सुसूत्रीकरण करावे, जलसंपत्ती प्राधिकरणचे घनमापन पद्धतीने शेतीसाठी पाणीपट्टी आकारण्याचे धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच पाणीपट्टीची आकारणी करावी, शेतीसाठी सलग दहा तास वीजपुरवठा व्हावा,

शेतीपंपांसाठी सरासरीऐवजी मीटर पद्धतीने बिलिंग सुरू करावे, अनियमित पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, आदी मागण्या पक्षाच्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्यांकडे गांभीर्याने बघण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT