Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Policy : स्थिर कांदा निर्यात धोरण हवे; २० टक्के निर्यात शुल्क माफ करा

Onion Market : कांदा किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या कांदाप्रश्नी हस्तक्षेपामुळे शेतकरी अडचणीत आहेतच. या बरोबरच निर्यातदारांच्याही कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर कांदा किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले.

मात्र हे २० टक्के शुल्क रद्द करण्यात यावे व कांदा निर्यात प्रश्‍नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये, स्थिर धोरण असावे, अशी मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली.

कांदा निर्यातमूल्य कमी झाल्यानंतर निर्वातशुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के केले. शुल्क पूर्णपणे माफ करण्यासाठी निर्यातदार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास सिंह यांच्यासह निर्यातदारांनी मंत्री जोशी यांची दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली.

या वेळी कांद्याच्या निर्यातीवर चर्चा झाली. केंद्र सरकारने कांद्याच्या दरात स्थिरता ठेवण्यासाठी स्थिर पद्धतीने कामकाज करावे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीच्या, प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादन घेत आहे.

त्यांच्यासाठीही पूरक धोरण असावे. निर्यातवाढीसह देशाला परकीय चलन मिळवून देण्यात कांद्याचा हातभार लागतो. या बाबींचा विचार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा निर्यातदार देश म्हणून भारताचे स्थान पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत, असे मुद्दे चर्चेदरम्यान मांडण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग, सचिव अमित कथराणी, स्वप्नील तन्ना, मनीष बोरा यांचा समावेश होता. मंत्री जोशी यांनी यापुढेही केंद्र सरकार कांद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT