ॲग्रो विशेष

Maratha Andolan : लालपरीची सेवा कोलमडली, मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल

Maratha quota agitation : मराठा समाजातील आंदोलकांवर जालन्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून अनेक ठिकाणी एसटी बस जाळणे तसेच दगडफेक झाल्याने अनेक आगारमध्ये बस सेवा ठप्प झाली होती.

Swapnil Shinde

Jalna Maratha protest : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ( maratha reservation) आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मराठा समाज (maratha community ) रस्त्यावर आला असून शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस पेटवून दिल्या. तसेच काही जिल्ह्यामध्ये बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जालना, बीड, उस्मानाबाद, नंदूरबार, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आगारातून शुक्रवारी रात्रीपासून बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात जाणाऱ्या बसेस स्थानकात थांबवल्यात आल्या.

धुळे-सोलापूर रोडवर एसटी महामंडळाच्या (ST Corporation)बसला आग लावण्यात आली होती. त्याची खबरदारी म्हणून संगमनगर आगारमधील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या. तसेच अहमदनगर, सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागातील ५४ फेऱ्या सकाळपासून रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या बसेस देखील आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील सर्व बसस्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अनेक बसस्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या स्थितीचा रिक्षा चालकांनी गैरफायदा घेतला. जादा भाडे आकारून त्यांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT