Agriculture Growth In FY26: मान्सून हंगामात चांगला पाऊस झाल्याने खरीप आणि रब्बीतून भरघोस पीक उत्पादनाचा अंदाज आहे. असे असूनही देशातील शेती आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रांच्या एकूण सकल मूल्यवर्धनात (gross value added) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वास्तविक आधारावर ३.१ टक्के इतक्या मर्यादित दराने वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात यात ४.६ टक्के दराने वाढ झाली होती..शेती आणि संबंधित क्षेत्रांचे एकूण सकल मूल्यवर्धनाचा नाममात्र आधारावर वाढ दर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केवळ ०.८ टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंतची त्याच्या वाढीची ही निचांकी पातळी आहे. मागील आर्थिक वर्षात त्याची १०.४ टक्के दराने वाढ झाली होती. महागाई दरात घट झाल्यामुळे हा मोठा फरक दिसून येत आहे..दरम्यान, मुल्यवर्धन वाढीतील घटीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. शेतमालास सध्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना खूप कमी परतावा मिळत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. .Year of Agriculture: मध्य प्रदेशात २०२६ हे कृषी वर्ष जाहीर.नाममात्र आधारावर, शेती आणि संबंधित क्षेत्रांचे एकूण मूल्यवर्धन (GVA) आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या तिमाहीत केवळ १.८ टक्के दराने वाढले. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील तिमाहीत ते ७.६ टक्के दराने वाढले होते. अन्नधान्य महागाई दरात तीव्र घट झाल्यामुळे ही घसरण प्रामुख्याने दिसून आली..आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत, शेती आणि संलग्न क्षेत्रांची सकल मुल्यवर्धनाची नाममात्र आधारावर वाढ ३.२ टक्के दराने होती. ही वाढ आर्थिक वर्ष २०२५ च्या याच कालावधीतील ७.५ टक्के दराने वाढीच्या तुलनेत खूप कमी राहिली..AI In Agriculture: ‘एआय’ तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढवा.शेतीशी संलग्न क्षेत्रांच्या, ज्यात प्रामुख्याने पशुधन, वनीकरण आणि मत्स्योद्योग यांचा समावेश आहे; त्यांच्या सकल मूल्यवर्धन वाढीत झालेल्या घसरणीमुळे शेती क्षेत्राच्या वाढीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..ही घसरण शेतीशी संलग्न क्षेत्र प्रभावित झाल्यामुळेही असू शकते. शेतीशी संलग्न क्षेत्राचा एकूण सकल मूल्यवर्धनात जवळपास ५० टक्के वाटा आहे, असे तज्ज्ञ सांगतात. .शेतमालांचे भाव किमान आधारभूत किमतींपेक्षा कमीकृषी मंत्रालयाकडील मिळालेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात मका, तूर, हरभरा, मूग, उडीद, नाचणी, भुईमूग, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख शेतमालांचे सरासरी घाऊक बाजारातील भाव किमान आधारभूत किमतींपेक्षा (MSP) ५ ते ३० टक्क्यांनी कमी आहेत. यात मका, मूग, उडीद आणि नाचणी याच्या भावात सर्वाधिक घसरण असल्याचे दिसून आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.