Jalna News: गेल्या २८ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मासिक चर्चासत्र निश्चित तारखेला आयोजित करण्याची परंपरा खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने कायम ठेवली आहे. त्यामुळे कृषी विज्ञान मंडळ हे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. .खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने १९९७ मध्ये दर महिन्याच्या पाच तारखेला कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकरी मासिक चर्चासत्राची परंपरा सुरू केली. नवीन वर्षातही कायम राहिली आहे. नुकतेच ५ जानेवारी रोजी कृषी विज्ञान केंद्राद्वारे ३४१ व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या चर्चासत्राच्या अन्नदानाचा खर्च मंडळाचे सदस्य असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याद्वारे स्वयंस्फूर्तीने केला जातो. यावेळीच्या चर्चासत्राचे विषय ‘माझी औषधी वनस्पतीची शेती’ आणि ‘पौष्टिक तृणधान्यांची खरेदी व्यवस्था, प्रक्रिया व मूल्यवर्धन’ हे होते..KVK, Kharpudi : काढणी पश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धनावर देणार भर.या विषयावर नांदेड जिल्ह्यातील डोंगरगाव येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी महादवाड आणि पुणे येथील मिलेट्स नाऊ या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, महेश लोंढे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक व मराठवाडा शेती साह्य मंडळाचे सचिव, विजयआण्णा बोराडे, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष, श्याम गट्टणी, कृषी उपसंचालक, संजय कायंदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती..कृषी उपसंचालक संजय कायंदे यांनी शेतकऱ्यांनी पीएमएफएमई आणि पोकरा या योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया व्यवसायाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पुणे येथील महेश लोंढे यांनी पौष्टिक तृणधान्ये, भरडधान्य यांचे महत्त्व विशद करून बाजरी, ज्वारी, भगर, राळा, नाचणी, सावा, वरई, कोदो मिलेट्स या तृणधान्याच्या प्रक्रियेस बाजारात चांगली मागणी असून, त्याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली..KVK Washim : वाशीमच्या ‘केव्हीके’ने केले तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य ; ‘ॲग्रोटेक’कृषी प्रदर्शनास विविध मान्यवरांची भेट.पौष्टिक तृणधान्ये उत्पादनाच्या सुधारित पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, सौर ऊर्जा, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. नांदेड येथील बालाजी महादवाड या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या औषधी वनस्पती शेतीचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, राहुल चौधरी यांनी केले..कृषी विज्ञान मंडळानेप्रदीर्घ प्रवासात शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन केले. यापुढे फक्त नावीन्यपूर्ण विषयांवरच चर्चा होणे अपेक्षित आहे. आजच्या चर्चासत्रातील औषधी वनस्पती हा विषय इच्छाशक्तीचा प्रश्न असून पौष्टिक तृणधान्ये प्रक्रिया हा सामूहिकपणे करण्याचा विषय आहे.- विजयअण्णा बोराडे, प्रगतशील शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.