डॉ. स्नेहल जोशीसष्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठचा ऊस पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. त्यामुळे जमिनीमध्ये दिलेली नत्र खते पाण्याबरोबर वाहून गेली. परिणामी, या वर्षी उसाला जास्त प्रमाणात तुरा आला आहे. जवळपास उसाच्या सर्वच जातींना महाराष्ट्रात तुरा येतो असे दिसून आले आहे. तुरा येण्याचे प्रमाण हे मुख्यत्वेकरून त्या भागाच्या भौगोलिक ठिकाणावर व हवामानावर अवलंबून असते. .कोणत्याही वनस्पतीची वाढ होणे, नंतर त्यास फुले येणे, परागीकरणानंतर फळधारणा होणे आणि फळातील बियांपासून परत त्याचे पुनरुज्जीवन होणे हा तर सृष्टीचा नियम. त्यास ऊस पीक अपवाद नाही. हा तुरा काही जातीमध्ये लवकर निसवतो, तर काही जातींमध्ये उशिरा निसवतो. जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही वर्षी उसाला जास्त प्रमाणात तर काही वर्षी कमी प्रमाणात तुरा आलेला आपल्याला दिसतो..Sugarcane Farming Technology: ‘एआय’ आधारित ऊसशेतीसाठी नॅचरल शुगरचा स्वतंत्र प्रकल्प.तुरा येण्याची कारणेठिकाणतुरा येण्याचे प्रमाण निरनिराळ्या भागामध्ये वेगवेगळे असते. उदा. दक्षिण महाराष्ट्रात तसेच कर्नाटक, आंध्र व तमिळनाडू भागात उसाला तुरा लवकर व जास्त प्रमाणात येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे ते ठिकाण किती अक्षांश व रेखांशावर आहे यावर अवलंबून असते..प्रकाशमान कालावधीउसाला तुरा येण्यासाठी १२.५ तासांचा दिवस व ११.५ तासांची रात्र असा प्रकाशमान कालावधी आवश्यक असतो. महाराष्ट्रात साधारणपणे असा कालावधी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत असतो. या कालावधीमध्ये कोंबामध्ये मेरीस्टॅमॅटिक टिश्यू बदल होऊन त्या भागातील वाढ थांबून प्रजननाच्या स्थितीमध्ये स्थित्यंतर होते..Sugarcane Farming: उसातील तुरा येण्यामागील कारणे, परिणाम अन् उपाय.हवामानज्या वर्षी पावसाचे प्रमाण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असते, त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते. दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान यामधील फरक कमी असल्यास तुरा येण्यास अनुकूल वातावरण असते. रात्रीचे तपमान १७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर तुरा येण्याचे प्रमाण बरेच कमी होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुऱ्याचे प्रमाण जास्त असते..जमिनीचा प्रकारज्या जमिनीत पाणी धरुन ठेवले जाते, पाण्याचा निचरा योग्य होत नाही, अशा भारी, पाणथळ जमिनीमध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. जास्त पाऊस येणाऱ्या भागामध्ये उथळ व जास्त निचरा होणाऱ्या जमिनीमधील उसास जास्त प्रमाणात तुरा येतो..Sugarcane Farming: शाश्वत ऊस खोडवा उत्पादनाचे तंत्रज्ञान.जमिनीतील नत्राचे प्रमाणपाणी साचून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण जरी योग्य असले, तरी त्याचे पिकाच्या मुळाद्वारे शोषण योग्य प्रमाणात न झाल्यामुळे, तसेच जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ जमिनीमध्ये नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पिकाच्या शाकीय वाढीसाठी आवश्यक असणारे नत्राचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीमध्ये ऊस पिकाला नत्राची उपलब्धता कमी झाल्यामुळे उसातील नत्राचे प्रमाण घटते. त्यामुळे उसाचे शाकीय वाढीतून प्रजननाच्या स्थितीमध्ये स्थित्यंतर होऊन तुरा लवकर व जास्ती प्रमाणात येतो..जातविविध जातीमध्ये तुरा येण्याचे प्रमाण हे कमी जास्त असते. जातीमधील आनुवंशिक गुणांवर अवलंबून असते. को ४१९, को ७२१९ आणि कोसी ६७१ या जातींना तुरा येण्यासाठी हवामान अनुकूल असेल तर लवकर व जास्त प्रमाणात तुरा येतो.को ७४०, कोएम ७१२५, को ७५२७, को ८६०३२, एमएस १०००१, कोव्हीएसआय ०३१०२, कोव्हीएसआय १२१२१, कोव्हीएसआय १८१२१ या जातींमध्ये कमी प्रमाणात तुरा येतो.व्हीएसआय ०८००५ या जातीला तुरा फारसा येत नाही..Sugarcane Farming: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर ऊस लागवड.वाढीची अवस्थातुरा येण्याच्या कालावधीमध्ये (ऑगस्टचा दुसरा पंधरवडा ते सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) जेव्हा उसाचे वय साधारणपणे ३.५ ते ४ महिन्याच्या पुढे असते.ऊस फुटव्यांची अवस्था संपवून वाढीच्या अवस्थेत असतो, त्या उसाला ३ ते ४ कांड्या आलेल्या असतात अशा उसास तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान असेल तरच तुरा येतो. ऊस जर उगवण किंवा फुटवा येण्याच्या अवस्थेमध्ये ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये असेल तर त्या उसाला तुरा येत नाही..तुरा आल्यामुळे होणारा परिणामतुरा येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याची पाने अरुंद होऊ लागतात. ती पिवळी पडण्यास सुरुवात होते. पानांचे क्षेत्रफळ कमी होते त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते.पोंग्यामधील असणाऱ्या कोंबाची वाढ थांबून जसजसे तुऱ्याची वाढ होऊ लागते. तुरा पोंग्यामधून बाहेर पडतो तसतसे उसाच्या कांड्यावरील डोळे फुटण्यास सुरुवात होते, त्यास पांगशा फुटल्या असे म्हणतात.तुरा आला की त्याची शाकीय वाढ थांबते, पक्वता येते. त्यामुळे रसाची शुद्धता वाढून साखर उतारा वाढतो. परंतु तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्याच्या पुढे न तोड होता राहिला तर पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते. उसातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे रसातील साखर उतारा कमी होतो. उसातील तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रस काढण्याच्या प्रमाणात जवळ जवळ १८ ते २० टक्क्यांपर्यंत घट येते. एकूण उसाच्या उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के आणि साखर उताऱ्यामध्ये जवळपास ०.८ ते १.० युनिटपर्यंत घट हवेतील तापमान जसे वाढत जाते तसतशी जास्त होते. उसाच्या जातीनुसार ही घट कमी, जास्त प्रमाणात झालेली आढळते..Sugarcane Farming: सुरु ऊस लागवडीचे तंत्र.तुरा नियंत्रणाचे उपायउसाला फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर एक महिन्यापर्यंत वाढवले, तर तुरा येण्याच्या प्रमाणात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होते. परंतु दक्षिण महाराष्ट्रामध्ये जिथे उसाला इतर भागापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात तुरा येतो तेथे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडतो. शेतामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे या उपायांचा अवलंब करता येत नाही.जास्त पाऊस असणाऱ्या भागामधील उथळ निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये बऱ्याच प्रमाणात नत्राचा ऱ्हास होतो. त्यासाठी अशा जमिनीमध्ये नत्र खताबरोबर निंबोळी पेंडीचा वापर केला तर नत्राचे निचरा होण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे तुरा काही प्रमाणात कमी करता येतो. तमिळनाडूमध्ये केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे, की २५ टक्के जादा नत्र लागणीपासून ६ महिन्यांपर्यंत सहा वेळा विभागून दिले, तर फुलोरा येण्याच्या प्रमाणात ४० टक्क्यांपर्यंत घट येते..उसाच्या शेंड्याकडील ३ ते ४ पाने फक्त फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये छाटली असता तुऱ्याचे प्रमाण जवळपास ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत कमी करता येते. परंतु मजुरांचा प्रश्न बिकट होत असल्यामुळे या उपायाचा अवलंब करणे अवघड आहे.योग्य जातीची निवड करुन शिफारस केलेल्या हंगामामध्ये लागवड करावी. आडसाली उसाची लागवड १५ जुलैच्या आधी करू नये. तो जर मे किंवा जूनमध्ये लावला तर त्यास सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत असताना नोव्हेंबरमध्ये तुरा येण्याची शक्यता असते. सुरू ऊस जो डिसेंबरपासून मार्चपर्यंत लावला जातो अशा उसाला त्याची शाकीय वाढ, पूर्ण होण्याच्या आतच तुरा येण्याची शक्यता असते. म्हणून ज्या विभागामध्ये विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात दरवर्षी हमखास तुरा येतो अशा क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात तुरा येणाऱ्या को ८०१४, को ८६०३२, एमएस १०००१, कोव्हीएसआय ०३१०२, कोव्हीएसआय १२१२१, कोव्हीएसआय १८१२१ पीडीएन १५००६, पीडीएन १५०१२ या या जातीची लागवड करावी.नदीबूड क्षेत्रामध्ये दरवर्षीच पावसाळ्यात हमखास पूर येतो, अशा क्षेत्रावर व्हीएसआय ०८००५ या तुरा न येणाऱ्या जातीची लागवड करावी..फुलोरा येण्याचा परिणामफुलोरा आल्यानंतर १.५ ते २ महिन्यांपर्यंत उसाच्या उत्पादनामध्ये आणि साखर उताऱ्यामध्ये विशेष अनिष्ट परिणाम होत नाही. उलट फुलोरा आल्यामुळे त्या उसाची पक्वता लवकर येते. त्यामुळे तो ऊस लवकर तोडणीसाठी घेता येतो. म्हणून साखर कारखान्यांना हंगाम सुरु झाल्यानंतर प्रथम उसाची पक्वता पाहून तोडणी करावी.आडसाली व पूर्वहंगामामध्ये लागण झालेला ऊस वेळेत तोडला गेला तर त्यावर फुलोऱ्यामुळे अनिष्ट परिणाम होत नाही. परंतु सुरू ऊस जो नोव्हेंबर ते मार्चपर्यंत लावला जातो त्या उसास फुलोरा आल्यामुळे त्याची शाकीय वाढ पूर्ण झाली नसल्यामुळे उत्पादन आणि साखर उताऱ्यामध्ये बरीच घट येते.उशिरा तुटल्या जाणाऱ्या उसाच्या खोडव्यामध्ये सुद्धा फुलोऱ्यामुळे नुकसान होते.डॉ. स्नेहल जोशी, ९४२२०२९९४९(सदस्य, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.