Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : पुणे जिल्ह्यात भात रोपवाटिकेसाठी रान भाजणीला वेग

Paddy Nursery : बियाणे खरेदी सुरू; पूर्वमोसमी पावसाचा परिणाम

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season : पुणे ः जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या भात पट्ट्यात भात रोपवाटिकेसाठी रान भाजणीच्या कामांना वेग आला आहे. भात बियाण्याची खरेदी करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरिपाची दोन लाख पाच हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहेत.
पश्‍चिम पट्ट्यात काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील बाळू भेंडारी म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात अनेक बदल झाले आहेत. सध्या भात रोपवाटिकेच्या कामांना
सुरूवात केली आहे. माझी एकूण सहा एकर शेती आहे. खरिपात भाताची अडीच ते तीन एकर एकरांवर लागवड करणार आहे. भात रोपे तयार करण्यासाठी रान भाजणी केली आहे.’’

शेतकऱ्यांना रोपवाटिकांचे प्रशिक्षण
पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहील. त्यासाठी ‘आत्मा’ व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून रोपवाटिकेची कामे सुरू केली आहेत.

एकूण आठ एकर शेती आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खरिपात अडीच ते तीन एकरांवर भात लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी पूर्ण झाली आहे. पाऊस झाल्यास रोपे तयार करणार आहे.
- रोहिदास लखिमले, शेतकरी, भोयरे, ता. मावळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT