Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुरू

Special Session On Maratha Reservation : मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. यावर आज मंगळवार (२० रोजी) राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आजच्या अधिवेशनात काय निर्णय होईल, याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.

या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यात बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने मंजूरी दिली आहे. तर या अहवालात आयोगाने मराठा समाजासाठी नवीन कायदा करून आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी स्वतंत्र संवर्ग करावा अशा शिफारस केली आहे.

शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या १० टक्के आरक्षण

राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेटने मंजूरी दिली असून या मसुद्यात मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. तसेच आयोगाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस मसुद्यात केली आहे.

या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बैठक घेत काँग्रेस आमदारांना सूचना केल्या आहेत. तसेच या विधेयकावर वरिष्ठ नेत्यांकडून बाजू मांडली जाणार आहे.

तुम्ही शब्द देताय पण

सगेसोयरे अंमलबजावणी आधी करणार? असा सवाल करत नोंजणी न सापडलेल्या मराठ्यांसाठी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकार शब्द देताय पण अंमलबजावणी करत नाही. आधी अंमलबजावणी करा म्हणजे लोक खुश होतील असेही ते म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. फक्त त्यांनी समाजाला आरक्षण द्यावं, सगे सोयरे अंमलबजावणीसह आरक्षण हे ओबीसीमधून मिळावे यासाठी आमदार, मंत्र्यांनी विषय लावून धरावा असे देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

साडेसहा लाख हरकती

यावेळी ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रियी दिली आहे. ते म्हणाले, आज मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन होणार आहे. सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत साडेसहा लाख हरकती सरकारकडे आल्या आहेत. यामुळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, सरकारने विरोधी भुमिका घेतल्यास ओबीसी पेटून उठेल असे म्हटले आहे.

विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं

राज्य सरकारने बोलावलेल्या या अधिवेशनावर खासदार संजय राऊत यांनी देखील मोजक्या शद्बात प्रतिक्रियी दिली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने मिटावा. भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे. विशेष अधिवेशन हे निर्णायक ठरावं. ओबीसीच्या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT