Maratha Reservation : आरक्षणासाठी लातूर, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले आहे. यापार्श्वभूमिवर राज्यातील मराठा समाजाकडून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहेत. रस्ता रोको केला जात आहे. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या केला.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon

Pune News : गेल्या आठ दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसले आहेत. तर त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. मराठा समाजाकडून विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या चालढकलीवर रोष व्यक्त करण्यासह जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज आक्रमक झाल्याचे आज शनिवार (१७ रोजी) समोर आले आहे. याचदरम्यान बीडमधील मराठा आंदोलकांवरील ३६ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयासमोर ठिय्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा वाढत आहे. विविध जिल्ह्यात मराठा समाज एकवटत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज शनिवारी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता. समाजाकडून येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

तसेच मराठा समाज बांधवांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली. तर गेल्या तीन ते चार दिवसापासून येथे सत्तेतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द ; कुणबी नोंदी असणाऱ्यांना नव्या आरक्षणाचा लाभ नाही

दरम्यान जिल्ह्यात पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे यांच्या कार्यालयासमोर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले होते. आज शनिवारी मराठा समाजाचा रोष केंद्रीय मंत्री कराड यांच्या कार्यालयासमोर दिसून आला. येथे मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली.

एसटी महामंडळाची बस अडवली

तसेच लातूरमध्ये देखील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाला असून आंदोलकांनी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या पळशी फाटा येथे एसटी महामंडळाची बस अडवली. त्यातील प्रवाशी खाली उतरवत रिकामी बस डेपोमध्ये परत पाठवली. तसेच मराठा आंदोकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नाशिकमध्येही रास्तारोको

यावेळी नाशिकच्या जुना नाका परिसरात देखील मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको करण्यात आला. यामुळे येथे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी आमचा आवाज सरकार दाबू शकत नाही अशा भावना व्यक्त केल्या.

मनोज जरांगे यांचे आवाहन

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना थांबण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी, आधी १९ला शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करा. त्यानंतर आपण २०, २१ला आंदोलनाची दिशा ठरवू असे ते म्हटले आहे. तसेच 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळतील', असेही ते म्हणाले.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या दरबारी अंतिम टप्प्यात?

मराठ्यांना १० टक्के आरक्षण

राज्य मागास आयोगाने मराठा समाजाबाबतचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. त्याच अहवालाच्या आधारे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मराठा समाजाला आरक्षणासाठी देण्यासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. या अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं जाण्याची दाट शक्यता आहे.

बीडमध्ये गुन्हे मागे घेतले जाणार

दरम्यान बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनात मोठ्या प्रमाणात रस्ता रोको, दगडफेक तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी पोलिसांकडून ७९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील ३६ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितली आहे.

तसेच पाच लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची नोंद ज्या गुन्ह्यात झाली आहे. ते मागे घेतले जाणार आहेत. तसेच नेत्यांची घरे व हॉटेल्स जाळणे अशा ४३ गुन्हे माफ केले जाणार नाही. तर त्यांचा तपास सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com