Loan Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Recovery : थकित वसुलीसाठी विशेष बैठक

Non-Agricultural Loans : बिगर शेती कर्ज थकित असलेली टॉप दीडशे थकबाकीदारांची नावे गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात आलेली आहेत. अजूनही यांच्याकडून वसुली झालेली नाही.

Team Agrowon

Yavatmal News : बिगर शेती कर्ज थकित असलेली टॉप दीडशे थकबाकीदारांची नावे गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात आलेली आहेत. अजूनही यांच्याकडून वसुली झालेली नाही. त्यामुळे आता या थकबाकीदारांकडील वसुली करण्यासाठी विशेष बैठक घेण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची ही बैठक झाली. टॉप दीडशे थकबाकीदारांचा आढावा व इतर विषयपत्रिकेवर होते. बिगरशेती कर्जाची वसुली करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला होता.

मात्र, त्या प्रकरणांतही वसुलीची गती कमी दिसत आहे. आता संचालक मंडळाने पुन्हा कर्जवसुलीची मोहीम हाती घेतली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकरणांतील वसुली व सद्यःस्थितीबाबत आढावा घेण्यात आला.

बँकेची स्थिती अडचणीची असल्याने वसुली हा एकमेव पर्याय बँकेपुढे आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी बँक आग्रही आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत याच थकित वसुलीसाठी संचालकांनी आग्रह धरला. त्यामुळे आता येणाऱ्या काळात थकित कर्जवसुलीला गती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणाचा सविस्तर आढावा व वसुली मोहिमेबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याशिवाय बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतही चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT