Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Management : मृग बहरात खत, सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर

Article by Sudarshan Sutar : जुनोनी (ता. सांगोला) येथे भारत रामचंद्र व्हनमाने यांची १० एकर शेती आहे. त्यात साडेतीन एकरांवर डाळिंब, तर उर्वरित दोन एकरांत आंबा, दीड एकरांत सीताफळ आणि एक एकरमध्ये पेरू लागवड आहे.

सुदर्शन सुतार

Farmer Orchard Management : शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी : भारत रामचंद्र व्हनमाने

गाव : जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : १० एकर

डाळिंब क्षेत्र : साडेतीन एकरमृग बहरात खत, सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर

जुनोनी (ता. सांगोला) येथे भारत रामचंद्र व्हनमाने यांची १० एकर शेती आहे. त्यात साडेतीन एकरांवर डाळिंब, तर उर्वरित दोन एकरांत आंबा, दीड एकरांत सीताफळ आणि एक एकरमध्ये पेरू लागवड आहे. १९८९-९० मध्ये पहिल्यांदा त्यांनी एक हेक्टरवर डाळिंब लागवड केली. त्यानंतर आतापर्यंत आलटून-पालटून क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करत आहे. सध्या त्यांच्याकडे पूर्वीच्याच मातृवृक्षावर गुट्टी कलम तयार करून नवीन बाग लागवड केलेली आहे.

सध्या जुनी अडीच एकर आणि नवीन एक एकर अशी साडेतीन एकरांत डाळिंब लागवड आहे. साडेतीन एकरांतील जुन्या डाळिंब बागेतून सरासरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. मागील वर्षी एकरी १२ टन उत्पादन मिळाले आहे. त्यास प्रतिकिलो ८० ते १२० रुपये असा दर मिळाला. डाळिंब विक्रीसाठी स्थानिक मार्केटमध्ये तसेच थेट जागेवरूनच व्यापाऱ्यांनी विक्री केली जाते.

डाळिंब लागवड

संपूर्ण डाळिंब लागवड मध्यम, हलक्या प्रतीच्या जमिनीत आहे.

लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घेण्यात आली.

दोन ओळींत १४ फूट, तर दोन रोपांत ७ फूट अंतर राखत लागवड. वर्षातून दोन वेळा प्रतिझाड अर्धा किलो शेणखताचा वापर.

बागेत मुख्यतः मृग बहर धरला जातो.

बहर नियोजन

यंदा मृग बहर धरण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी फेब्रुवारीपासूनच बागेत नियोजित कामांस सुरुवात केली.

फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान बाग ताणावर सोडली. हा ताण साधारण २० एप्रिलच्या दरम्यान ठिबकद्वारे सिंचन करून तोडला.

ताण तोडण्यापूर्वी साधारण १५ एप्रिलला बागेची छाटणी करून घेतली.

ताण कालावधीत प्रति झाड दहा किलो शेणखत आणि रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात म्युरेट ऑफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, १०ः२६ः२६, मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला आहे.

याशिवाय ताण कालावधीत बागेत दर १० दिवसांनी रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत.

त्यानंतर बागेची पानगळ करण्याचे नियोजित होते. तत्पूर्वी तीन ते चार दिवस आधी बागेस प्रतिदिन ४ ते ५ तास सिंचन केले. त्यानंतर इथरेलची फवारणी करून पानगळ करून घेतली.

सध्या दर आठवड्याला ०ः५२ः३४, ०ः०ः५०, बोर्डो एक टक्का व कीटकनाशक-बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत आहे.

मुळांची वाढ चांगली होण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा ड्रीपच्या माध्यमातून वापर केला जाईल.

त्यानंतर ०ः५२ः३४, १३ः०ः४५ दर दहा दिवसांनी २ ते ३ वेळा देण्याचे नियोजन आहे. तसेच जिवामृताचा वापर करत आहे.

आगामी नियोजन

पुढील आठवड्यात झिंक, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फेरस यांचा प्रत्येकी दोन किलो प्रति एकर याप्रमाणे डोस देणार आहे.

साधारणतः १५ मे ते १ जूनदरम्यान बागेची स्वच्छता केली जाईल. बागेतील अतिरिक्त फुटी काढून झाडांना आकार दिला जाईल.

सध्या वातावरण स्वच्छ आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या हलक्या फवारण्या घेतल्या जातील.

बाग सध्या सेटिंग अवस्थेत आहे. मधमाश्यांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पुढील काळात तापमानात आणखी वाढ होईल. त्यामुळे झाडांची पाण्याची गरज वाढेल. त्यासाठी वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन प्रतिदिन दोन ते तीन तास ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

भारत व्हनमाने, ९८६०९५५८१४

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT