Soybean MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP : सोयाबीनला हमीभाव मिळावा : ‘किसान संघा’ची मागणी

Kisan Sangh Demand : सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल ६ हजार ९४५ रुपयांचा हमीभाव मिळावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल ६ हजार ९४५ रुपयांचा हमीभाव मिळावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना आजरा तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे, की राज्यात या वर्षी सोयाबीन पिकाचे सुमारे पन्नास लाख हेक्टरचे क्षेत्र असून, दुसऱ्या नंबरचे नगदी पीक आहे. सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल आहे. सोयाबीन पिकाचा सरासरी उत्पादन खर्च ६ हजार ३९ रुपये क्विंटल आहे.

त्या अनुषंगाने राज्य सरकारने कृषिमूल्य आयोगाकडे प्रतिक्विंटल ६ हजार ९४५ रुपयांची खरेदी हमीभाव दिला जावा, अशी शिफारस केली असून रास्त व योग्य आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिफारस केलेला दर दिला जावा.

बाजारात या वर्षी सोयाबीन खरेदीदारांनी सांघिक प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजारांवर जाऊ दिलेला नाहीत. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभदायक किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने दरावर किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी.

कीड-रोगांमुळे पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्याला घामाचा दाम मिळावा. बाळगोंडा पाटील, सचिन जाधव, सचिन देशपांडे, रणधीर माने, प्रकाश रावण यांच्यासह शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT