Dharashiv News : अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा क्षेत्र अधिक दिसत असले तरी प्रत्यक्षात सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनचे क्षेत्र यंदा सर्वसाधारणच्या तुलनेत पावणे दोन पटींनी वाढले आहे. मात्र, फटका बसण्याची शक्यता असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
जिल्ह्यातील सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८४ हजार हेक्टर आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन क्षेत्र सुमारे ४ लाख ७८ हजार हक्टर होते. यंदा ते ४ लाख ६२ हजार हेक्टर इतके आहे. म्हणजे १६ हजार हेक्टरने यंदा हे क्षेत्र घटले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बहुंताश भागात यंदा सततच्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शिवारत पीक दिसत असले तरी त्यात सतत पाणी साचून राहिले. परिणामी पिके पिवळी पडली. त्याचा फुलधारणेवर परिणाम होऊन प्रतिझाड शेंगा कमी लागल्या. त्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीने जिल्ह्याच्या बहुतांश भागांना तडाखा दिला. त्यामुळे उरलेली पिकेही उध्वस्त झाली. त्यामुळे सरासरी क्षेत्र जास्त दिसत असले तरी सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसेल, अशी स्थिती आहे.
तूर, उडीद, मूग क्षेत्र वाढले
सोयाबीनचे दर दबावात राहिल्याचा काहिसा परिणाम सोयाबीन पिकाच्या क्षेत्रावर झाला आहे. तूर, उडीद, मूगाला बऱ्यापैकी दर राहिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र कमी करून त्याजागी तूर, उडीद, मूग या पिकांची पेरणी केली आहे.
त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातही उडदाने सरासरी क्षेत्राच्या पुढे मजल मारली आहे. तूर क्षेत्र १० हजार ५०० हेक्टरनी वाढले आहे. मूग क्षेत्रात ५ हजार हेक्टर, तर उडीद क्षेत्रात २३ हजार २०० हेक्टर वाढ झाली आहे.
पंचनाम्यानंतरच समजणार नुकसानीचे एकूण क्षेत्र
प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीने ६ हजार ६७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन क्षेत्र किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंचनाम्यांच्या कार्यवाहीचे चित्र अजून स्पष्ट नाही. त्यामुळे पिकांचे पंचनामे कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
खरिपातील प्रमुख पिकांची स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक सर्वसाधारण क्षेत्र गेल्यावर्षीचे क्षेत्र यंदाचे क्षेत्र
सोयाबीन २,८४,३०० ४,७८,७०० ४,६२,८००
उडीद ४५००० २८,२०० ५१,४००
तूर ८८,७०० ३३,००० ४३,५००
मूग २३,००० ६,३०० ११,३००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.