Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : दराअभावी सोयाबीन घरातच पडून

Soybean Market : एकीकडे पिवळ्या सोन्याचे दर ७३ हजारांच्या वर गेले असून, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर घसरले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : एकीकडे पिवळ्या सोन्याचे दर ७३ हजारांच्या वर गेले असून, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर घसरले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी अजूनही शेतीमाल घरातच ठेवला आहे. सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत गेल्याने अजूनही विदर्भातील जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे.

सोयाबीन विदर्भातील शेतकऱ्यांचे दुसरे हुकमी पीक आहे. कापसानंतर सोयाबीनचा पेरा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर आदी विदर्भातील जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

अडचणीच्या काळात सोयाबीन पिकानेच शेतकऱ्यांना आधार दिला आहे. यंदा अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसला. कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले.

अतिपावसाने पिकांची वाढ खुंटल्याने उत्पन्नातही घट झाली होती. हाती आलेल्या उत्पन्नाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कापूस, सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांना दर मिळालेले नाही.

सोयाबीनला हमीदरापेक्षा कमीच दर मिळत आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीनचे दर पाच हजार ३५० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र यानंतर सोयाबीनचे दर सातत्याने खाली येत गेले आहे.

दरात घसरण झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकता घरातच ठेवणे पसंत केले आहे. अजूनही विदर्भातील जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.

दर सुधारल्यानंतर सोयाबीन काढू अशी मनःस्थिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना असलेल्या गरजेनुसार काही ठिकाणी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहे. खरीप हंगाम तोडांवर असल्याने सध्या सोयाबीन विक्रीला येत असले तरी दरात घसरण सुरूच आहे. सोन्याचे दर सातत्याने गगनाला भिडत असताना शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर खाली आले आहे.

सोयाबीन काढणीनंतर दरात घसरण झाली. सोयाबीनला या हंगामात सरासरी चार हजार दोनशे रुपयांचे दर मिळाले आहे. मध्यंतरी काही दिवसांसाठी दरात वाढ झाली होती. सध्याचे दर चार हजार दोनशे ते चार हजार चारशेपर्यंत आहे. ही स्थिती विदर्भातच असल्याने अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच आहे.
विजय मुधंडा, संचालक, खासगी बाजार समिती, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT