Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात भरमसाठ वाढ

Team Agrowon

आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची प्लेसमेंट, नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून, या वर्षी काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत.

Soybean Seed | Agrowon

सोयाबीन बियाण्याचे होलसेल दरच भरमसाट वाढविल्याने आता विक्रेतेही साहजिकच शेतकऱ्यांना त्यापेक्षा अधिक दराने विक्री करणार हे निश्‍चित आहे.

Soybean Seed | Agrowon

दुसरीकडे पारंपरिक सोयाबीन वाणांचे बियाणे जुन्याच दराने बाजारपेठेत दिसणार आहे.

Soybean Seed | Agrowon

एका कंपनीने २३ किलो वजनाच्या बॅगची किंमत तब्बल ४१५० रुपये काढली आहे. तर दुसरे एक वाण २५ किलो बॅगेमध्ये ३४५० रुपयांना होलसेल विकल्या जात आहे.

Soybean Seed | Agrowon

गेल्या हंगामात प्रचंड मागणी झालेल्या मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या वाणाची किंमत यंदा किलोला २०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. तसेच या नावाजलेल्या वाणासोबत त्याच कंपनीचे कीडनाशक घेण्याची सक्ती केली जात आहे.

Soybean Seed | Agrowon

जो विक्रेता कीडनाशक विकेल त्यालाच हा वाण पुरवल्या जातो. मागील हंगामाच्या तुलनेत सोयाबीनच्या एका बॅगेमागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

Soybean Seed | Agrowon

पारंपरिक ३३५ आणि ९३०५ या वाणांना मागणी कमी राहत असल्याने दरही वाढलेले नाहीत आणि फारशी विचारणाही केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती बाजारपेठेत आहे.

Soybean Seed | Agrowon

Animal Care : अशी ओळखा जनावरांतील धनुर्वाताची लक्षणे

आणखी पाहा