Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : शेतकऱ्यांकडून आर्थिक निकडीपोटी सोयाबीन बाजारात

Soybean Rate : ग्राहक हित नजरेसमोर ठेवत केंद्र सरकारकडून खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा फटका तेलबिया उत्पादकांना बसत आहे.

Team Agrowon

Amaravati News : ग्राहक हित नजरेसमोर ठेवत केंद्र सरकारकडून खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा फटका तेलबिया उत्पादकांना बसत आहे. विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर दबावात आले आहेत.

अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ४५५० ते ४६४५ रुपयांचा दर मिळत आहे. पुढे दरवाढीची शक्यता वाटत नसल्याने आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे.

सोयाबीनचे दर यंदाच्या हंगामात पाच हजार रुपयांच्या वर राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. पाच हजार रुपयांवरून दर थेट ४५५० ते ४६४५ रुपयांवर आले आहेत.

सध्याची एकंदरीत स्थिती बघता त्यात वाढीची कोणतीच शक्‍यता नसल्याने शेतकरी हतबलतेने सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परिणामी अमरावती बाजार समितीत रोजची आवक ७ हजार २६७ क्‍विंटलवर पोचली आहे.

दररोज इतकी आवक होत असल्याने बाजार फुल्ल झाला आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत आवक ३४५ क्‍विंटल इतकी आहे. या ठिकाणी किमान ४२०० तर कमाल ४६०० आणि सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळत आहे.

पश्चिम विदर्भातही दर दबावात

वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब मानला जातो. याच जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत सरासरी ४ हजार क्‍विंटल सोयाबीनची आवक होत आहे. या ठिकाणी किमान ४४५० तर कमाल ४६७० आणि सरासरी ४५९० रुपयांचा दर मिळत आहे.

यवतमाळ बाजार समितीत देखील ४४०० ते ४६२० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. शेगाव (बुलडाणा) बाजार समितीमधील आवक अवघी ५० क्‍विंटलची तर दर ४२०० ते ४६०० याप्रमाणे होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT