Soybean Market : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन दर दबावातच

Soybean Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारातील सोयाबीनचे दर गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारातील सोयाबीनचे दर गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. शनिवारी (ता. ६) सोयाबीनची ८२५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४३०० ते कमाल ४७०३ रुपये तर सरासरी ४५०१ रुपये दर मिळाले.

सोमवार (ता. १) ते शनिवार (ता. ६) या कालावधीत हिंगोली धान्य बाजारात सोयाबीनची ४२१४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ४४२४ ते ४७६० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ५) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४३०० ते कमाल ४६७० रुपये, तर सरासरी ४४८५ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत

गुरुवारी (ता. ४) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४९०१ रुपये, तर सरासरी ४७०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ३) सोयाबीनची ६९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१९९ ते कमाल ४६५० रुपये, तर सरासरी ४४२५ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean, Onion Market : सरकारने शेतकऱ्यांचा `करेक्ट कर्यक्रम` कसा केला? सरकारच्या कोणत्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली?

मंगळवारी (ता. २) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५४० ते कमाल ४९८० रुपये, तर सरासरी ४७६० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १) सोयाबीनची ६९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५५० ते कमाल ४९७० रुपये, तर सरासरी ४७६० रुपये दर मिळाले.

गेल्या आठवड्यापासून कमाल दर पाच हजार रुपयाच्या आत, तर किमान दर साडेचार हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. दरात सुधारणा होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली आहे. धान्य बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com