Soybean Procurement Process Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

Soybean Rate : सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात सोयाबीन हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना म्हणजे विलंबाने केवळ दोन खरेदी केंद्रे सुरू केली. त्यात पोर्टल तीन दिवस बंद राहिल्याने नोंदणी रखडल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. तर बुधवारी (ता. १३) सायंकाळी सोलापूरसह वैराग, अकलूजला नवे तीन खरेदी केंद्रे सुरू केली असून गुरुवार (ता. १४) या केंद्रांवर खरेदीला सुरवात होणार आहे.

सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. मात्र, सरकारने आठ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असली तरी उशिरा बार्शी व मानेगाव या दोनच ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली.

त्यातच सरकारने नोंदणी पोर्टलमध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे तीन दिवस ते बंद राहिल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. २४ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर चार नोव्हेंबरपर्यंतच्या ११ दिवसांत केवळ ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सध्या सोलापूर बाजार समितीत सोयाबीनची आवक ४०० ते ५०० पोती आहे.

आवक घटली असली तरी मॉईश्चर (ओलावा) कमी झाल्याने चांगला माल बाजारात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार हजार ५० ते चार हजार ४५० रुपयांना सोयाबीन विकावा लागत आहे. सोयापेंडला मागणी नसल्याने दरात सुधारणा होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोर्टलमधील तांत्रिक बदलामुळे ते तीन दिवस बंद राहिले. शेतकऱ्यांना ओटीपीसह काही तांत्रिक बदल पोर्टलमध्ये केले गेले आहेत. बुधवारपासून पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. त्याशिवाय सोलापूरसह वैराग, अकलूजला नवे तीन खरेदी केंद्रे सुरू केली असून गुरुवारपासून खरेदीला सुरवात होईल.
- हरिदास भोसले, पणन अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Sugarcane Season 2024 : ‘बळीराजा’चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

Maharashtra Election 2024 : ऊस उत्पादकांच्या मतांना निवडणुकीत आला भाव

SCROLL FOR NEXT