Soybean production  AGROWON
ॲग्रो विशेष

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Soybean : सततच्या पावसाने नुकसान ः येलो मोझॅक, पांढरी माशीचे आक्रमण

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील २८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन येलो मोझॅक व पांढरी माशीच्या आक्रमणाने हातून जाणार आहे. सततच्या पावसाने उर्वरित क्षेत्रातील फुलोऱ्यावरील सोयाबीनलाही धोका निर्माण झाला असून नुकसानीमुळे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता कृषी विभागाने पाहणीअंती वर्तविली आहे. कापूस व तुरीवरही कीड-रोगांचे आक्रमण झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत ७३६.२ मिमी पाऊस झाला.

अपेक्षित ८०५.७० मिमीच्या तुलनेत तो ९१ टक्के असून पावसाची तूट असली तरी तो सतत झाल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके जिल्ह्यात घेतली जातात. यंदा जिल्ह्यात २ लाख ६४ हजार ८४० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी आहे. पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. सतत पावसामुळे १९ हजार ७३ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. तिवसा तालुक्यातील २६१० हेक्टरमधील सोयाबीनवर पांढरी माशीचा तर, ५३८८ हेक्टरमधील सोयाबीनला शेंगा नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९४६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनवर मूळकुज या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे व दर्यापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे फूलधारणा व फळधारणा झालेली नाही.

सतत झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असून उत्पन्नात घट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, दर्यापूर व धारणी तालुक्यातील फुलोऱ्यावर आलेल्या कापसाची वाढ सततच्या पावसाने खुंटली आहे. काही भागांत या पिकावर तुडतुडे व फूल किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर पिकांवर पांढरी माशी, फुलकिडे, रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांनी डोमकळी वेचून नष्ट करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. २ लाख ३६ हजार ६४७ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पीक व त्यावरील रोग सोयाबीन येलो मोझॅक, पांढरी माशी कापूस तुडतुडे, फूल किडे, गुलाबी बोंडअळी तूर मर, पिकेपिवळी पडणे मूग मावा कीड संत्रा बुरशी, फळगळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT