Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Soybean Market : आधारभूत केंद्रावर सोयाबीन विक्री ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. १५) असून ही नोंदणी करण्याची व्यवस्था केंद्रावर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात कोरेगाव येथे खरेदी-विक्री संघाच्या गोदामात हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले आहे. तसेच सातारा, फलटण, कऱ्हाड, मसूर येथे नोंदणी सुरू झाली आहे. आधारभूत केंद्रावर सोयाबीन विक्री ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. १५) असून ही नोंदणी करण्याची व्यवस्था केंद्रावर करण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ११) कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने आणि कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन, नाफेड आणि सहकार व पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

या केंद्राचे उद्‌घाटन कोरेगावच्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) प्रीती काळे यांच्या हस्ते, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, कोरेगाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले,

बाजार समितीचे सचिव संताजी यादव, केशव मदने, आनंदा जाधव, शेतकरी माणिकराव भोसले, बाळासाहेब साळुंखे आदी उपस्थितीत झाले. तसेच सातारा, फलटण, कऱ्हाड, मसूर येथे नोंदणी सुरू झाली आहे. या ठिकाणी लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहेत.

जिल्ह्यात पाच ठिकाणी सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्रास मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. १५) असून नोंदणी करण्याची व्यवस्था केंद्रावर करण्यात आली आहे.
- संजयकुमार सुद्रिक, उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT