Soybean Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

Soybean buying center : खरेदीची प्रक्रिया मात्र अद्याप नाही, उडीद, मुगाची नोंद शून्य

Team Agrowon

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात एनसीसीएफ या केंद्रीय एजन्सीमार्फंत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून एकूण १७ ठिकाणी किमान हमीदरानुसार उडीद, मूग व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. यात सोयाबीन विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व ऑनलाइन नोंदणी केली.

परंतु उडीद व मुगासाठी बाजारात अधिक दर असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात एनसीसीएफ या केंद्रीय एजन्सीमार्फत मार्केटिंग फेडरेशनकडून १४ तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडन तीन असे एकूण १७ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या खरेदी केंद्रावर उडीद व मुगासाठी १० ऑक्टोबरपासून, तर सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली.

उत्पादनात झालेली घट तसेच बाजारात असलेल्या अधिकच्या दरामुळे शेतकऱ्यांनी उडीद व मूग विक्रीसाठी नोंदणी केली नाही. परंतु सध्या सोयाबीनच्या शासकीय खरेदी दरात तसेच बाजारभाव पाचशे ते सातशे रुपयांचा फरक असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करीत आहेत. आजपर्यंत १७ खरेदी केंद्रावर २७६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु सोयाबीनची पहिल्या दिवशी शासकीय खरेदी झाली नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

१४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू...

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यात १४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. यात अर्धापूर (ता. अर्धापूर), मुखेड, बेटमोगरा, जांब व धनंज (ता. मुखेड), मानवाडी फाटा व हदगाव (ता. हदगाव), बिलोली, वन्नाळी व देगलूर (ता. देगलूर), लोहा, गणेशपूर (ता. किनवट), रातोळी (ता. नायगाव), तर विदर्भ को-ऑपरेटिव्हकडून धर्माबाद, नायगाव व उमरी येथे खरेदी केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रात सोयाबीन, उडीद व मूग विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT