Soybean Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Processed Food : सोयाबीन प्रक्रिया पदार्थाचा प्रचार, प्रसार करावा

Soybean Processing : महिलांनी विविध ठिकाणी स्टॉल व प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन प्रक्रीया पदार्थाचा प्रचार व प्रसार करावा व विक्री करावी, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : महिलांनी विविध ठिकाणी स्टॉल व प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन प्रक्रीया पदार्थाचा प्रचार व प्रसार करावा व विक्री करावी, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, ता. जालना अंतर्गत, गृहविज्ञान विभागामार्फत ग्रामीण महिला व युवतीकरिता चार दिवसीय कालावधीचा सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावरील प्रशिक्षण ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

त्याच्या समारोप प्रसंगी डॉ. सोनुने बोलत होते. या प्रशिक्षणाची सुरुवात प्रसंगी केव्हीकेच्या गृहविज्ञान तज्ञ डॉ. एस. एन. कऱ्हाळे व अन्नतंत्र विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पाटील हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणात अन्न तंत्र विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. एस. एस. पाटील यांनी ग्रामीण महिलांना करण्यायोग्य विविध प्रक्रिया उद्योग त्याचे लेबलिंग, पॅकिंग व मार्केटिंग, महिलांचे उद्योजकीय गुण व मानसिकता या विषयावर प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला.

जालना येथील सौ. योगिता खान्देभराड यांच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योग युनिटला भेट देण्यात आली. महिलांना जयश्री निकम यांनी सोयाबीन पासुन सोया दूध, पनीर पप्रा प्रात्याक्षिकाद्वारे तयार करून दाखवले.

डॉ. एस. एन. कऱ्हाळे यांनी महिलांना सोयाबीनचे आहारातील महत्त्व पटवून दिले. बँक ऑफ महाराष्ट्र आरसेटीचे कैलास तावडे यांनी उद्योग उभारणीसाठी बँक प्रस्ताव तयार करणे याविषयी सविस्तर माहिती दिली.

समारोप प्रसंग डॉ. एस. व्ही. सोनूने, कृषी अभियंता प्रा. पंडित वासरे, अन्नतंत्र विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पाटील व गृहविज्ञान तज्ञ कऱ्हाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांनी प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शेवटी सर्वाना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या प्रशिक्षणात सिरसवाडी,खनेपुरी, गुरु पिंपरी, मोती गव्हान, धानोरा, जालना येथील एकूण १६ महिला, पुरुष तसेच युवतीनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कऱ्हाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT