Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

soybean Production : सोयाबीन कापणी व कापूस वेचणी सोबतच आली आहे. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.

Team Agrowon

Dharashiv News : सोयाबीन कापणी व कापूस वेचणी सोबतच आली आहे. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. सोयाबीन कापणीसाठी शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

अंकुशनगर परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास प्रारंभ केला आहे. कापूस वेचणीलाही मुहूर्त लागला आहे. मात्र, सोयाबीन काढणी व कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. यावर्षी अतिवृष्टीने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

परंतु आता उघाड असल्याने शेतकऱ्याने सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे. पावसाने सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे नवीन सोयाबीनला बाजारात भाव कमी आहे. यावर्षी कपाशीची अवस्था पण चांगली नाही. काही भागात कपाशी पीक चांगले तर काही भागात बिकट परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

त्यातच कपाशीच्या झाडांची पाने लाल पिवळी पडून गळून राहिली आहे. तर काही ठिकाणी कपाशीचे झाडच वाळताना दिसत आहे. निसर्गाचा असमतोलपणा सांभाळत शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक हातात आणले आहे.

सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मजुरांना सोयाबीन कापणीचे बोलत आहेत. मात्र, मजूर वर्गाकडून एकरी पाच ते सहा हजार रुपये लागतील, तर आम्ही सौदा पक्का करू नाही तर तुम्ही तुमचे पाहून घ्या, असे सांगण्यात येत आहे.

कापूस वेचणी १० रुपये किलोने

कापूस वेचणीसाठीही मजुरांचा तुटवडा आहे. मजुरांना किलोला वेचणीसाठी दहा रुपये द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मात्र विलंब झाला, तरी चालेल. मात्र, सोयाबीन कापणीसह कापूस वेचणीही घरच्या घरी करण्याचा निश्चय केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT