Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Rain In Kolhapur : पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे खरीप हंगामातील पीके चांगली आली होती. एकूण एक लाख ८६ हजार सत्तावीस हेक्टरवर पेरणी झाली होती.

sandeep Shirguppe

Soybean Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे हातात आलेलं खरिपातील पीक वाया जाण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, भुईमूग, भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना फटका बसल्याने कृषी खात्याने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तीन दिवस जिल्ह्यात ढगफुटी सुदृश्य पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले, ओढे, शेतात सरी भरून पाणी वाहत आहे. यामुळे खरिपातील हजारो हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे खरीप हंगामातील पीके चांगली आली होती. एकूण एक लाख ८६ हजार सत्तावीस हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये सर्वाधिक ९० हजार हेक्टरवर भात पेरणी झाली होती.

चाळीस ते पन्नास टक्के भात कापणी ला आले होते. ढगफुटी सुदृश्य पावसामुळे भात खाली पडले असून पाणी साचल्यामुळे भात पिकाला फटका मोठा फटका बसला आहे. भात पिकाखालील हजारो हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे.

भुईमुगाची ३४ हजार २६२ हेक्टर वर पेरणी झाली होती. भुईमूग काढणीला आले होता. सलग पाऊस सुरू असल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या भुईमुगाला मोड येणार असून भुईमुगाच्या हजारो हेक्टरवर क्षेत्रावर फटका बसला असण्याची शक्यता आहे.

चाळीस हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीन काढणीला आले होते. पीक गव्हाळले असताना जोरदार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. सोयाबीनच्या पंधरा ते अठरा हजार हेक्टरवर पिकाला फटका बसल्याची शक्यता आहे.

पुराने नदीकाठी, अतिवृष्टीने माळावर हानी

खरिपातील तृणधान्याची सुमारे एक लाख हेक्टर पेरणी झाली होती. भुईमूग ,कारळा ,सोयाबीन इतर तेल बिया असे एकूण ७४ हजार हेक्टर पेरणी झाली होती. सर्वाधिक फटका सोयाबीन व भुईमुग पिकाला बसला आहे. सुरुवातीला पुराने गेले नदीकाठचे ,आता माळ रानावरील अतिवृष्टीमुळे पीक गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT