Kolhapur Police : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८०० कार्यकर्त्यांना अटक; शाह, राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम

Sugarcane Issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले.
kolhapur agriculutre News
kolhapur agriculutre Newsagrowon
Published on
Updated on

Amit Shah Kolhapur : केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या आज २५ सप्टेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यावर पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या जवळपास ८०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना पेठवडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सन २०२२ -२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या उसास प्रतिटन ४०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे -बंगळुरू महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते.

सदर आंदोलना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले. जवळपास १० महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमीका घेतली आहे.

यावर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, "देशाचे सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महापुरात झालेले नुकसान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील शंभर रुपये प्रति टन दुसरा हप्ता देण्याचा संदर्भातला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने झालेला निर्णय याची अंमलबजावणी न होणे. यासाठी दहा महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या नेत्यांचा स्वागत काळी निशाण दाखवून करणार आहेत".

kolhapur agriculutre News
Amit Shah : सहकार मंत्री अमित शाह आज कोल्हापुरात, राजकीय घडामोडींना वेग

"परंतु हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी दडपशाही सुरुवात केली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे ८०० कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून नोटीसा देत धरपकड सुरू केली आहे. परंतु सरकारने कितीही दडपशाही केली तरी आंदोलन होणारच आणि हे आंदोलन होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर ते शंभर रुपये देण्याच्या संदर्भामध्ये आणि पूरग्रस्तांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये विचार करून निर्णय जाहीर करावा अन्यथा आम्ही कोल्हापुरात येणाऱ्या पाहुण्यांना काळे झेंडे दाखवणारच असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com