Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसाह्यासाठी ई-केवायसी करावी

Soybean Subsidy : सदरचे अर्थसाहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, यासाठी राज्यातील सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे,

Team Agrowon

Solapur News : राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना ०.२० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर ०.२० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर ५ हजार रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी त्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया तत्काळ करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सदरचे अर्थसाहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, यासाठी राज्यातील सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे,

या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत, त्यांची ई-केवायसी करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यक्तिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी https://scagridbt.mahait.org या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे.

त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. कृषी सहाय्यक त्यांचे लॉगिन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT