Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २,३९८ कोटींचे अनुदान

Agriculture Subsidy Update : गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक ४९ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे २,३९८ कोटी रुपयांचे सोमवारी (ता. ३०) अनुदान वाटप करण्यात आले.
Cotton and Soybean
Cotton and SoybeanAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक ४९ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे २,३९८ कोटी रुपयांचे सोमवारी (ता. ३०) अनुदान वाटप करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीवेळी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कळ दाबून या योजनेतील पैसे वितरित करण्यात आले.

४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत २,३९८ कोटी ९३ लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. २०२३ च्या खरीप हंगामात एकूण ९६ लाख ७८७ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण ४,१९४ कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी १,५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी २,६४६ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे

Cotton and Soybean
Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ; शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह ‘महाआयटी’द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. सोमवारी जवळपास ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्यात आले.

कापूस व सोयाबीन खात्यांची संख्या : ९६ लाख
पोर्टलवर भरलेल्या खात्यांची माहिती : ६८ लाख ६ हजार ९२३
४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६४ हजार खात्यांना अर्थसाहाय्यासाठी अपेक्षित रक्कम : २,३९८ कोटी ९३ लाख

Cotton and Soybean
Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

पीक---शेतकरी खातेदार---लागवडीखालील क्षेत्र---रक्कम (कोटी)
कापूस---३३.१७ लाख---३०.४५ लाख---१५४८.६४
सोयाबीन---६२.८३ लाख---५१.६६ लाख---२६४६.३४
एकूण---९६ लाख---८२.११ लाख---४१९४

आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तस तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अनुदानाचा लाभ दिला जाईल.
धनंजय मुंडे, कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com