Soymeal Agrowon
ॲग्रो विशेष

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Market Update : भारतातून एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान १९ लाख ४५ हजार टन तेलबियापेंड निर्यात झाली. मागील वर्षी याच याच काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यंदाची निर्यात ४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

Anil Jadhao 

Pune News : भारतातून एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान १९ लाख ४५ हजार टन तेलबियापेंड निर्यात झाली. मागील वर्षी याच याच काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यंदाची निर्यात ४ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सोयापेंड निर्यात ८ लाख ४८ हजार टन झाली होती. मागीलवर्षीच्या तुलनेत सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ही माहिती दिली. 

ऑगस्ट महिन्यातही तेलबिया पेंड निर्यात घटली आहे. भारतातून ऑगस्टमध्ये ३ लाख १४ हजार टन तेलबिया पेंड निर्यात झाली. तर २०२३ च्या ऑगस्टमधील तेलबिया पेंड निर्यात ३ लाख ५४ हाजर टन झाली होती. म्हणजेच यंदाच्या ऑगस्टमधील निर्यात ४० हजार टनांनी कमी होती. दक्षिण कोरिया भारताच्या तेलबिया पेंड आयात करणारा मोठा देश ठरला. दक्षिण कोरियाने एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ३ लाख ३८ हजार टनांची आय़ात केली होती. दक्षिण कोरियाने अडीच लाख टन मोहरी पेंड आयात केली, ६४ हजार टन एरंडी पेंड आणि २४ हजार टनांची सोयापेंड आयात केली. 

दक्षिण कोरियानंतर व्हिएतनामने जास्त तेलबिया पेंड आयात केली. मागील ५ महिन्यात व्हिएतनामने १ लाख १३ हजार टनांची आयात केली होती. यात ९३ हजार टन मोहरी पेंड आयात केली. तर साडेसात हजार टन सोयापेंड आणि दोन हजार टन शेंगदाणा पेंड आयात केली होती. थायलंडने १ लाख ८१ हजार टनांची आयात केली. यात १ लाख ७९ हजार टन मोहरी पेंड आणि ३ हजार टन सोयापेंडची आयात केली होती. 

भारताने एप्रिल ते ऑगस्ट या ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८४ हजार टन मोहरी पेंड निर्यात केली होती. मागीलवर्षी याच काळातील मोहरी पेंड निर्यात ११ लाख ५५ हजार टन निर्यात झाली होती. बांगलादेश आणि दक्षिण कोरियाला मोहरी पेंड निर्यात जास्त झाली होती. एरंडी पेंड निर्यात १ लाख १६ हजार टनांची झाली होती. तर गेल्यावर्षी १ लाख ४६ हजार टनांची निर्यात झाली होती. 

सोयापेंड निर्यात वाढली

मागील पाच महिन्यात ८ लाख ४८ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. मागीलवर्षी याच काळातील सोयापेंड निर्यात ४ लाख ८१ हजार टनांची निर्यात झाली होती. मागील ५ महिन्यात इराण आणि फ्रान्स या दोन देशांनी सर्वाधिक सोयापेंड आयात केली. इराणने १ लाख १४ हजार टनांची आयात केली. तर फ्रान्सने ८३ हजार ६०३ टन आयात केली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT