Soybean Crop Damage agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damaged : पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान, कोल्हापुरात पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट

sandeep Shirguppe

Yellow Alert Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तसेच पुढचे काही दिवस पाऊस जोर धरण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. २२ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार कालपासून (ता. २२) पावसाला सुरुवात झाली. आज सोमवारी(ता.२३) सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने दुपारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सध्या सोयाबीन काढण्याची लगबग शेतकरी करत आहेत अशातच होत असलेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला सोमवारी व मंगळवारी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. सोयाबीन, मूग, उडीद पिके काढणीला आली असताना सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन भिजू लागले आहे, तर सोयाबीन रचून त्यावर प्लास्टिकच्या आवरणाने झाकून कडकडीत उन्हाची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत.

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांची घाईगडबडीने सोयाबीन कापून मळणी करून घेण्याची धावपळ सुरू आहे. तसेच शिरोळ तालुक्यात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु होत असलेल्या पावसाने टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे नुकसान होत आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्याने फुलांच्या बागा कोलमडून पडल्या आहेत.

कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. काल (ता.22) रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आठवडी बाजाराची दैना उडाली. भाजीपाला विक्रेत्यासह नागरिकांचीही धावपळ झाली. शिवाय काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.८ मि. मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले, करवीर तालुक्यात झाला. तर धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यातील धरणे ९० टकक्यांहून अधिक भरली असल्याने पुढील काळातील पाण्याची चिंता मिटली आहे.

पावसाच्या तालुक्यांतच गाठली नाही सरासरी

यंदा पावसाने नऊ तालुक्यांमध्ये दमदार हजेरी लावली. मात्र, राधानगरी, गगनबावडा, चंदगड या पावसाच्या तालुक्यांमध्येच पावसाला सरासरी गाठता आलेली नाही. गगनबावड्यात १ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत ४६६०.५ मि.मी. पाऊस होतो, यंदा ३३३०.० पाऊस झाला. राधानगरीत ३२८५.७ पाऊस होतो, यावेळी १९२७.४ पाऊस झाला; तर चंदगडमध्ये २५०२.२ मि.मी. पाऊस बरसतो, यावर्षी १८९१.९ मि.मी. पाऊस झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे टोमॅटो दर ?

Soybean Crop : चार एकरावरील सोयाबीन पिकावर फिरवला रोटाव्हेटर

Mahatma Phule Crop Loan Scheme : पीक कर्ज परतफेड केली; आम्हालाही लाभ द्या, वंचित शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT