Survey Railway Line Kolhapur : शक्तिपीठ महामार्गानंतर कोल्हापुरातून दुसऱ्या एका मार्गाचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांचा विरोध

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाची टांगती तलवार असतानाच शासनाकडून कोल्हापूर- बेळगाव-धारवाड या पश्चिम दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
Survey Railway Line Kolhapur
Survey Railway Line Kolhapuragrowon
Published on
Updated on

Railway Line Survey Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर हा मार्ग रद्द करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्तिपीठ महामार्गामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन जाणार असल्याने जोरदार करत आहेत. जिल्ह्यातील करवीर, कागल आणि हातकणंगले तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन जाणार असल्याने विरोध होत आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाची टांगती तलवार असतानाच शासनाकडून कोल्हापूर- बेळगाव-धारवाड या पश्चिम दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

याबाबत करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे काम बंद पाडले. या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी व हलसवडे गावातून मोनार्क सर्वेअर पुणेकडून केले जात आहे. त्याला येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध केला.

यावेळी सांगवडेवाडी गावचे सरपंच सुदर्शन खोत म्हणाले, 'शक्तिपीठ महामार्ग रद्दचा निर्णय शंकास्पद असून, त्यासाठी शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. त्यातच या रेल्वे मार्गामुळेही चांगली सुपीक जमीन जाणार असून, यापूर्वी दूधगंगा धरणग्रस्त व कालव्यासाठीही शेतजमीन अधिग्रहण केली आहे.

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. आज सर्वेक्षणाचे काम आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बंद पाडले आहे आणि हा रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी संबंधित विभागाकडे करणार आहोत.

Survey Railway Line Kolhapur
Shaktipeeth Highway : महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्ग अखेर रद्द, सरकारकडून लवकरच निर्णय

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य पोपट सिद्धनुर्ले, अनिकेत जाधव, आण्णासाहेब खोत, अभय चौगुले, रावसाहेब चौगुले, सुकुमार खोत, धनराज खुडे, बाळासाहेब खोत, राजगोंडा पाटील, शिवाजी पाटील, शीतल खोत, जनगोंडा मजगे, चंद्रकांत चव्हाण, मोनार्कचे युनिट प्रमुख विठ्ठल बनसोडे, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com