Soybean Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Retreating Monsoon : परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका

Soybean Harvesting : सरासरीहून अधिक झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. असे असले तरी सध्या शिल्लक असलेले सोयाबीन सोंगणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Yavtmal News : सरासरीहून अधिक झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. असे असले तरी सध्या शिल्लक असलेले सोयाबीन सोंगणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतशिवारातच सोयाबीनची गंजी लावलेली आहे. मात्र, परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यंदा जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसानंतरही पिके सुस्थितीत होती. जुलै तसेच ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने कापूस, सोयाबीनसह इतर पिकांनाही फटका बसला. त्यामध्ये जिल्ह्यातील शंभराहून अधिक महसूली मंडलांत अतिवृष्टी झाली.

कधी नव्हे ते यंदा सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाई २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला आहे.

तरीसुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन सुस्थितीत दिसत आहे. अशा शेतकऱ्यांनी आता सोयाबीन सोंगणीला सुरुवात केली आहे. कापून ठेवलेल्या सोयाबीनचा ढीग शेतशिवारातच लावून ठेवल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने परतीच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. दोन दिवसांपासून पुसद, दिग्रस, यवतमाळ, दारव्हा आदी तालुक्यांत पाऊस झाला आहे.

गुरुवारी (ता.१०) दुपारपर्यंत वातावरण चांगले होते. मात्र, दुपारी दोन वाजतानंतर ढगाळ वातावरण व त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणतः पाऊणतास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT