Soybean Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : काढणीला आलेल्या सोयाबीनवर पावसाचा घाला

Heavy Rain Crop Loss : गेल्या चार दिवसांपासून औसा तालुक्यातील किल्लारी आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.

Team Agrowon

Latur News : गेल्या चार दिवसांपासून औसा तालुक्यातील किल्लारी आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारीही (ता. ४) या भागात सरी बरसल्या. अनेक शेतांतील काढणीला आलेल्या सोयाबीनवर पावसाने घाला घातल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

सततच्या संततधार व अतिपावसाने काढणीसाठी आलेले सोयाबीन पीक भिजल्यामुळे काळे पडत आहे. मेहनत वाया जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी शेतकरी कुटुंबांतील लहानापासून थोरापर्यंत एकत्र येऊन भरपावसात सोयाबीन काढणीचे काम करीत आहेत.

काढलेल्या सोयाबीनला सुरक्षित स्थळी ठेवावे लागते. अन्यथा लागलीच रास करावी लागते. ते रानावर ठेवल्यावर त्याला मोड फुटतात व केलेली वर्षभराची मेहनत वाया जाते, असे येथील शेतकरी बालाजी क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी दीपक पाटील यांनी केली.

पाऊस एकीकडे, नोंद दुसरीकडे

किल्लारी येथे ग्रामपंचायतीजवळ पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी पडलेल्या पावसाची नोंद होते, मात्र इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यास नोंद होत नाही. या भागात साखर कारखाना परिसराकडे मुसळधार पाऊस बसरला, मात्र अतिवृष्टीची नोंद नसेल तर काय करावे, असे शेतकरी महादेव बिराजदार यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT