Soybean cotton
Soybean cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton : शेतकऱ्यांना भीक नको, घामाचे दाम द्या

टीम अॅग्रोवन.

बुलडाणा ः शासनाने सोयाबीनला (Soybean Rate) साडेआठ व कापसाला (Cotton Rate) साडेबारा हजार रुपये दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना भीक नको, त्यांच्या घामाचे दाम द्या. येत्या आठ दिवसांत जर सोयाबीन, कापसाच्या भावाचा व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांचा निर्णय न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन (Farmer Protest) पेटेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला.

सोयाबीन, कापूस उत्पादकांसह विविध मागण्यांसाठी बुलडाण्यात रविवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. चिखली मार्गावरील देवीच्या मंदिरापासून हा भव्य मोर्चा सुरू झाला. संपूर्ण शहरभर शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. या वेळी महिलांचाही या मोर्चात हजारोंचा सहभाग होता.

या वेळी सभेत तुपकर म्हणाले, की गेल्या वर्षीही या प्रश्नांवर मोर्चा निघाला. शासनाने दखल घेत भाव वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले. यंदा शेतकऱ्यांच्या घरात शेतीमाल यायला लागला तर बाजारात भाव कमी आहेत. शासनाने १५ लाख टन ‘डीओसी’ ही टप्प्याटप्प्याने निर्यात करावी. सोयाबीनची निर्यात सुरू झाली तर दरवाढीला मदत होईल. आधीच पावसामुळे यंदा सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालेला आहे.

तर एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन येत आहे. बाजारात सोयाबीन चार हजारांनी विकत आहे. शेतकऱ्यांना यंदाची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही. पीकविमाही मिळालेला नाही. काही शेतकरी हे दोन्ही कर्जमाफीमधून वगळल्या गेले आहेत, अशांना कर्जमाफीची गरज आहे.

ग्रामीण भागात महिला बचत गटांकडील कर्ज वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी दमदाटी करीत आहेत. शासनाने मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सोयाबीनला साडेआठ व कापसाला साडेबारा हजारांचा दर दिल्या जावा, यासाठी आठवडाभराची मुदत दिली जात आहे. या काळात काही निर्णय न घेतल्यास राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. यानंतरच्या परिणामांची जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही तुपकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

Green Manuering : जमिनीला आच्छादन अन् उन्हाळ्यात सावलीही

Kolhapur Farmer : खासगी सावकाराला कंटाळून शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, शिरोळ तालुक्यातील घटना

Silk Farming : रेशीम शेतीने दिला सक्षम पर्याय

Lok Sabha Election : पुणे जिल्ह्यात शांततेत मतदान

SCROLL FOR NEXT