Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : खानदेशात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले

Soybean Farming : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ४५ हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे ३४ हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ४५ हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे ३४ हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे.

धुळे व नंदुरबारात सोयाबीनची पेरणी कमी असते. या भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी मका, कापूस आदी पिकांना पसंती दिली आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढेल, कारण पाऊसमान बरे आहे, अशी भीती शेतकऱ्यांना होती. यामुळे नंदुरबार, धुळ्यातील पेरणी फारशी वाढलेली नाही. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मागील महिन्यातच बऱ्यापैकी झाली आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याची व्यवस्था केली आहे.

सोयाबीनचे दर मागील खरिपात बऱ्यापैकी होते. किमान ४२०० व कमाल ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना हंगामात मिळाला. नंतरही दर टिकून होते. आता पेरणीच्या वेळेसही दर ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु अन्य पिकांचा पर्याय चांगला नसल्याने सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. पुढेही चार हजार रुपयांवर दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे.

सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारात वाढण्याची शक्यता फारशी नव्हती. या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे १२ हजार ६०० हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी २८ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु पेरणी वाढली आहे. पेरणीनंतर पाऊस आल्याने पेरणी यशस्वी झाली आहे. दुबार पेरणीची वेळ अपवाद वगळता आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

पेरणी काळ्या कसदार जमिनीत अधिक सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीन रावेर भागात कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सोयाबीन आहे. सोयाबीन पीक अनेकांचे २० दिवसांचे झाले आहे. काहींचे पीक फूटभर उंचीचे झाले आहे. पेरणी जनच्या सुरुवातीलाच अनेकांनी केली होती.

यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक बऱ्यपैकी दिसत आहे. त्यात एक वेळेस रासायनिक खतही अनेकांनी दिले आहे. काळ्या कसदार जमिनीतील पीक चांगले असून, वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी लहान फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपात उत्पादन घेतल्यानंतर आपल्याकडील बियाण्यांची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी केली आहे. यामुळे बियाण्यांवरील मोठा खर्च शेतकऱ्यांनी कमी केल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT