Agrowon Sanvad Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : सोयाबीन, कापसामध्ये मृत सरी काढा : डॉ. गरुड

Dr. Hanumant Garud : कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंधारण आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीनमध्ये चार ओळींनंतर एक आणि कापसामध्ये दोन ओळींनंतर एक मृत सरी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तर अतिरिक्त पाणी सरीवाटे वाहून जाईल.

Team Agrowon

Beed News : कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंधारण आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीनमध्ये चार ओळींनंतर एक आणि कापसामध्ये दोन ओळींनंतर एक मृत सरी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तर अतिरिक्त पाणी सरीवाटे वाहून जाईल. कमी पावसाच्या परिस्थितीत सरीत पाणी जिरून पिकांना फायदा होईल, असा सल्ला खामगाव कृषी विज्ञान केंद्रातील कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉ. हनुमंत गरुड यांनी दिला.

‘सकाळ ॲग्रोवन’ आणि ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरसिंगा (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (ता. १८) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गरुड म्हणाले, की सोयाबीनची लागवड पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. कापूस लागवड सघन पद्धतीने करावी. झाडांची संख्या वाढल्यामुळे एकरी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ मिळते.

डॉ. श्रीकृष्ण झगडे म्हणाले, की सध्या सोयाबीनचे पीक अतिशय चांगले दिसत असले, तरी येत्या काळात खोडमाशी आणि चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून कीडनियंत्रणाचे उपाय योजावेत. कोरोमंडलचे उपमहाव्यवस्थापक डॉ. विनेश रेगे म्हणाले, की तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करावे. त्यामुळे खतांच्या मात्रा योग्य प्रमाणात देता येते. रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल. शिफारशीनुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. या वेळी त्यांनी कोरोमंडलच्या विविध उत्पादनांची सविस्तर माहिती दिली.

संवाद कार्यक्रमाला कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक सूर्या रेड्डी, कृषितज्ज्ञ बाबूराव वाघमोडे, विपणन अधिकारी ललित पाटील, रमेश नागरगोजे, राहुल लोखंडे, सरपंच विजय शिंदे, प्रगतिशील शेतकरी दत्ता शिंदे, माउली शिंदे, राजेंद्र शिंदे, श्रीधर सानप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित वाणी यांनी केले. ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी विजय पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rural Conclave: शाश्वत भविष्यासाठी सामूहिक विचारमंथन

Flower Exhibition: पुण्याच्या एम्प्रेस गार्डनमध्ये अवतरलीय फुलांची नवलाई!

Milkweed Crop: पर्यायी फायबर म्हणून ‘मिल्कवीड’ला प्रोत्साहन

Industry Chair: ‘इंडस्ट्री चेअर’द्वारा कुशल मनुष्यबळ निर्मिती

Agri Export Scam: शेतीमाल निर्यात फसवणूकप्रकरणी अटक

SCROLL FOR NEXT